Lavoo Mamledar: पोलिस अधिकारी ते आमदार! राजीनामा ते अफाट लोकसंपर्क; लवू मामलेदारांचा प्रवास

Lavoo Mamledar Journey: सध्या पर्वरी येथे राहणारे फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांच्या आकस्मिक निधनाबद्दल सर्वच क्षेत्रांतून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
Lavoo Mamledar Death News
Lavoo MamledarDainik Gomantak
Published on
Updated on

Lavoo Mamledar Information

फोंडा: मूळ दुर्गाभाट - फोंडा येथील; पण सध्या पर्वरी येथे राहणारे फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांच्या आकस्मिक निधनाबद्दल सर्वच क्षेत्रांतून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. उद्या (रविवारी) फोंड्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी तसेच दोन कन्या असा परिवार आहे.

पोलिस अधिकारी ते आमदार असा प्रवास केलेल्या लवू मामलेदार यांना विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजय मिळू शकला नाही. गोवा पोलिस खात्यात सुरुवातीला उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू झालेले लवू मामलेदार यांनी निरीक्षक ते उपअधीक्षक पदापर्यंत मजल मारली होती. आपल्या पोलिस सेवेच्या कारकिर्दीत त्यांनी वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्र, फोंडा, पणजी मुख्यालय आणि राखीव पोलिस दल अशा अनेक ठिकाणी सेवा बजावली होती.

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी वाहतूक पोलिस उपअधीक्षक पदाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. मात्र, गोवा विधानसभेच्या २०१२ च्या निवडणुकीत फोंडा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी २०११ मध्ये त्यांनी उपअधीक्षक पदाचा राजीनामा दिला आणि मगो पक्षात प्रवेश केला.

Lavoo Mamledar Death News
Lavoo Mamledar Death: ..आणि रिसेप्शन काऊंटरसमोर ते कोसळले! माजी आमदार लवू मामलेदारांसोबत नेमके काय घडले? वाचा घटनाक्रम

मगो पक्षाचे नेते तथा विद्यमान आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांचे बालमित्र असलेले लवू मामलेदार यांना काँग्रेसचे तत्कालीन बडे नेते रवी नाईक यांच्या विरोधात मगो पक्षातर्फे २०१२ च्या निवडणुकीत फोंडा मतदारसंघातून निवडणूक उमेदवारी दिली आणि मगो पक्षाचा विश्वास सार्थ ठरवताना लवू मामलेदार यांनी रवी नाईक यांचा पाडाव करून फोंडा मतदारसंघातून जिंकून येण्याची किमया साधली. त्यावेळेला मगोप आणि भाजपची युती होती. आमदारकीच्या काळात लवू मामलेदार हस्तकला महामंडळाचे अध्यक्षही होते.

नंतर २०१७ च्या निवडणुकीत मगोप आणि भाजपची युती तुटली आणि रवी नाईक यांनी लवू मामलेदार यांना हरवून आपले वर्चस्व सिद्ध केले. २०१७ च्या निवडणुकीनंतर लवू मामलेदार आणि सुदिन ढवळीकर, दीपक ढवळीकर यांच्यात वितुष्ट निर्माण झाले.

Lavoo Mamledar Death News
Goa Ex-MLA Death: क्षुल्लक कारणावरून रिक्षा चालकासोबत झालेला 'तो' वाद ठरला लवूंसाठी जीवघेणा!

त्यावेळेला लवू मामलेदार यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला; पण तीनच महिन्यांनंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि २०२२ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळेला २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तिकिटावर लवू मामलेदार यांनी सुदिन ढवळीकर यांच्या विरोधात दंड थोपटले. मडकई मतदारसंघातून लवू मामलेदार पराभूत झाल्यानंतर राजकारणातून ते बाहेर पडल्यातच जमा होते; पण लोकसंपर्क कायम होता. त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com