Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धक्कादायक! बापासह दोन मुलांचा अल्पवयीन दत्तक मुलीवर बलात्कार; गुन्हा दाखल

दोन मुलांपैकी एक जण अल्पवयीन

Akshay Nirmale

Goa Crime: दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर बापासह दोन मुलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोव्यातील तिसवाडी तालुक्यात हा प्रकार घडला आहे. पीडीत मुलगी 14 वर्षांची आहे. तर अत्याचार करणाऱ्यांपैकी एक मुलगा देखील अल्पवयीन आहे.

या कुटूंबात पती-पत्नी आणि दोन मुलगे असे चौघे जण राहत होते. दरम्यान, या मुलीला या कुटूंबाने दत्तक घेतले होते. दत्तक घेतल्यापासून या चार जणांच्या कुटूंबासमवेत ही मुलगी वास्तव्यास आहे.

दरम्यान, तिच्यावर गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार सुरू असल्याचे समोर आले आहे.

रविवारी दोनपैकी एका भावाने तिला चुकीच्य पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही मुलगी घरातून बाहेर पडली. तिने ही बाब शेजाऱ्याला सांगितली. हे ऐकून शेजाऱ्यालाही धक्का बसला. त्यानंतर संबंधित शेजाऱ्याने एका एनजीओला ही माहिती दिली.

एनजीओने पीडीत मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केल्यावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एनजीओला पीडीतीने दिलेल्या माहितीनुसार मार्च 2021 पासून तिच्यावल लैंगिक अत्याचार केले जात आहेत.

दोघापैकी एका भावाने तिच्या छातीला आणि खासगी अवयवांना स्पर्श केला. त्यानंतर तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर वडील आणि दुसऱ्या मुलानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

या प्रकाराबाबत पीडीतेच्या आईला काहीही माहिती नव्हती. कारण ती कामासाठी घराबाहेर पडायची. दरम्यान, ही माहिती समोर आल्यानंतर एनजीओनी पोलिसांना बोलावून सर्व माहिती त्यांच्या कानावर घातली.

या प्रकरणी आगाशी पोलिस ठाण्यात पीडीतेच्या वडिलांसह एका मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या अल्पवयीन मुलाला तद्नुषंगिक कारवाई केली जात आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधिन वाल्सन यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: तेरेखोल नदी ओलांडून 'ओंकार हत्ती' वाफोलीत, दोडामार्गच्या दिशेने चालला परत; Watch Video

Panaji Crime: पणजी पोलिस स्थानकासमोर राडा! 2 गटांत तुंबळ हाणामारी; 7 जणांना अटक

Goa Live News: मुसळधार पावसामुळे फूटपाथ कोसळला

Sawantwadi: सावंतवाडीत 2 गटांत राडा! मारहाण, अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न; पुणे, सिंधूदुर्गातील 9 जणांना अटक

Goa politics: खरी कुजबुज; विजय-मनोज युतीने लढणार?

SCROLL FOR NEXT