Goa Temperature: गोव्यात ऑक्टोबर हीटला सुरवात; पणजीत कमाल तापमानाची नोंद

रविवारसह सोमवारीही तापमान चढेच
Goa Temperature
Goa TemperatureDainik Gomantak

Goa Temperature: मॉन्सूनच्या समाप्तीनंतर आता राज्यात उकाडा वाढत चालला आहे. ऑक्टोबर हीट जाणवू लागली आहे. गेल्या आठवडाभर राज्यात तापमान चढेच होते. तर सोमवारी राज्याची राजधानी पणजीत सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली.

रविवारी पणजीतील कमाल तापमान ३४ अंशांवर पोहोचले होते तर सोमवारीही राज्यात कोरडे हवामान होते आणि पणजीचा पारा ३५ अंश सेल्सिअसवर पोहचला होता. या दिवसांतील सर्वसामान्य तापमानाच्या तुलनेत हे नोंद झालेले तापमान २.३ अंशांनी जास्त आहे.

Goa Temperature
Goa Literacy Rate: गोवा 7 महिन्यात बनणार 100 टक्के साक्षर राज्य! 1500 निरक्षरांचे शिक्षण सुरू...

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आगामी काही दिवसांसाठी जो अंदाज वर्तवला आहे, त्यानुसार राज्यात उष्ण तापमान चढेच राहू शकते. 29 ऑक्‍टोबरपर्यंत वातावरण कोरडे राहिल. शिवाय, हिवाळा सुरू होताच सकाळी धुके असू शकते.

त्यामुळे ज्यामुळे पहाटेच्या वेळी दृश्यमानता कमी असल्याने वाहनधारकांनी वाहने चालवताना काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ही काळजी घ्या...

गोव्यात ऑक्टोबर हीट वाढत असताना, लोकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. या काळात शरिराला हायड्रेटेड ठेवावे लागेल. त्यासाठी जास्तीत जास्त द्रव पदार्थाचे सेवन करायला हवे. पाणी, ज्यूस, नारळपाणी पिणे हिताचे ठरू शकते.

बदलत्या हवामानासाठी तयार राहणे गरजेचे आहे. उन्हात फिरावे लागणार असेल तर छत्री, टोपी, स्कार्फ याशिवाय घराबाहेर न पडण्याची खबरदारी घ्यायला हवी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com