Goa Literacy Rate: गोवा 7 महिन्यात बनणार 100 टक्के साक्षर राज्य! 1500 निरक्षरांचे शिक्षण सुरू...

निरक्षर प्रौढांच्या शिक्षणासाठी 9 समन्वयकांची नियुक्ती
Goa will become 100 % literate state
Goa will become 100 % literate stateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Literacy Rate: आगामी वर्षात गोवा राज्य शंभर टक्के साक्षर राज्य बनणार आहे. निश्चित्त सांगायचे तर, राज्य सरकारने 30 मे 2024 पर्यंत 100 % साक्षरतेचे प्रमाण गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

निर्धारित वेळेत हे लक्ष्य साध्य झाल्यास गोवा हे देशातील केरळनंतरचे दुसरे शंभर टक्के साक्षरता असलेले राज्य बनेल.

न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम (NILP) अंतर्गत राज्यात आधीच केवळ 1,500 निरक्षर नागरिक असल्याचे नोंद झाले आहे. त्यांना साक्षर करण्यासाठी वर्ग देखील चालवले जात आहेत. विशेष म्हणजे, या कार्यक्रमांतर्गत आढळून आलेल्या निरीक्षरांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे.

केंद्र सरकारच्या या उपक्रमाद्वारे, प्रत्येक राज्यातील निरक्षर व्यक्तींना 100 टक्के साक्षर करण्यासाठी त्यांची ओळख निश्चित्त करण्यात आली आहे. (Goa will become 100 % literate state)

Goa will become 100 % literate state
37th National Games साठी गोवा मेडिकल कॉलेज रूग्णालयात 'स्पेशल इमर्जन्सी रूम'

गोव्याबाबत बोलायचे झाले तर 30 मे 2024 रोजी म्हणजेच गोव्याच्या राज्य स्थापना दिनानिमित्त गोवा 100 टक्के साक्षर झाल्याचे घोषित करण्यासाठी स्टेट कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (SCERT) तर्फे प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, यापुर्वीच 9 प्रौढ संसाधन प्रशिक्षणार्थी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्याकडे निरक्षरांना शिकविण्याचे काम सोपविण्यात आले आहे.

दरम्यान, येत्या काळात, उच्च माध्यमिक शाळांतील NSS च्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची योजना आखली जात आहे.

हे विद्यार्थी स्थानिक पंच सदस्यांना किंवा नगरसेवकांना भेटतील. निरक्षर व्यक्तींची ओळख पटवून त्यांना शिक्षित करतील. निरक्षर लोकांमध्ये 19 ते 60 वयोगटातील स्थानिक तसेच स्थलांतरित नागरिकांचा समावेश आहे.

Goa will become 100 % literate state
Goa Government Jobs: सरकारी नोकरीसाठी आता अनुभव गरजेचा; किमान एक वर्ष अ‍ॅप्रेंटिसशिप करावी लागणार...

आधी वाचन आणि लेखन त्यानंतर आयटीआय किंवा व्यावसायिक केंद्रांद्वारे विविध विषयांमध्ये व्यावसायिक शिक्षणही त्यांना देण्याची इच्छा सरकारची आहे.

केंद्राकडून या निरक्षरांना साक्षर करण्यासाठी जो अभ्यासक्रम, पुस्तके मिळाली आहेत ती हिंदी भाषेतून होती. तथापि, SCERT ने ते मराठी आणि कोकणीमध्ये उपलब्ध केले आहे. दरम्यान, या सर्व निरक्षर व्यक्तींची परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेतली जाणार आहे, असेही कळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com