CM Pramod Sawant | Smart City Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: सिमेंटच्या रस्त्यांचे काम पावसाळ्यातही सुरू राहणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांची केली पाहणी

गोमंतक ऑनलाईन टीम

गोव्याची राजधानी पणजीमध्ये स्मार्ट सिटी योजनेतून सुरू असलेल्या कामांमुळे संपूर्ण शहरात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी आणि मनस्ताप ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यातच आता पाऊसही हजेरी लावत आहे.

त्यामुळे सर्वसामान्यांच्या त्रासात आणखीच भर पडत आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी रात्री पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी केली.

(CM Pramod Sawant inspects Smart City Work in Panaji)

मुख्यमंत्री सावंत यांनी सांतीनेज ते काकुलो मॉल या मार्गावरील कामांची माहिती घेतली. येथे रस्त्याचे काम सुरू आहे. उन्हात या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य आणि पावसात चिखलाचे साम्राज्य असे चित्र असते. या कामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, सिमेंटच्या रस्त्याचे काम पावसातही सुरू राहिल, पावसात हे काम सुरू राहू शकते. त्यामुळे काहीही अडचण येणार नाही, ऑक्टोबरअखेर कोणतेही काम शिल्लक राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचे काम पावसाळ्यात केले जाईल. पावसाळ्यात एका महिन्यात हे काम पुर्ण करण्याचे नियोजन आहे. लोकांना थोडाफार त्रास होईल. कोणत्याही कामात खंड पडणार नाही. पावसाचा कोणताही अडथळा या कामांत येणार नाही.

मुख्यमंत्री म्हणाले की, भविष्यात धुळ होणार नाही. त्यासाठीच ही कामे पावसाळ्यात सुरू राहतील. ऑक्टोबरनंतर सिमेंट रस्त्यांचे काम केले जाईल. पणजीमध्ये पाणी तुंबण्याची जी समस्या उद्भवते त्याचे कारण पावसाळ्यात काम सुरू असताना कळणार आहे.

काँक्रिट रस्त्यांच्या कामांना पावसामुळे काहीही अडचण येणार नाही. त्यातून ड्रेनेजची समस्या कायमस्वरूपी मिटवली जाईल. हे काम देखील पावसात करणे शक्य आहे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: आरोन जॉर्जनं धू-धू धुतलं, मग दीपेश-कनिष्कनं गारद केलं, टीम इंडियानं पाकिस्तानला 90 धावांनी लोळवलं VIDEO

School Bus Accident: 25 शाळकरी मुलांवर काळाचा घाला! स्कूल बस नदीत कोसळल्याने हाहाकार; पालकांची धावपळ

Accident News: कार थेट झाडावर आदळली, रामनगर-धारवाड महामार्गावर भीषण अपघात; पणजीच्या 55 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

2 मुलं, 6 वर्ष एकत्र; धुरंधर फेम अर्जुन रामपाल 'एंगेज्ड'! गिर्ल्डफ्रेन्डबद्दल म्हणाला, 'मी तिच्यामागे लागलो कारण ती..."

IND vs PAK: डोक्याला चेंडू लागला, पण मैदान सोडलं नाही, भारताचा 'फायटर' लढला; हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची केली चांगलीच धुलाई VIDEO

SCROLL FOR NEXT