Delhi-Mumbai Express Way: दिल्ली-गोवा प्रवासाचा वेळ आता 15 तासांनी घटणार; वाचा सविस्तर...

दिल्ली-बडोदा अंतर 18 ऐवजी 10 तासात होणार पूर्ण
Delhi-Mumbai Express Way
Delhi-Mumbai Express Way Dainik Gomantak

Delhi-Mumbai Express Way: दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे मुळे दिल्ली-गुजरात प्रवास खूप वेगवान होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वरील दिल्ली-बडोदा सेक्शन या वर्षीच्या डिसेंबरपासून खुला करण्यात येणार आहे.

त्यामुळे दिल्ली-बडोदा या दोन शहरांदरम्यान प्रवासासाठी लागणारा वेळही मोठ्या प्रमाणात घटणार आहे. दिल्ली-बडोदा प्रवासाला 18 तास लागतात. मात्र दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वरून वाहतूक सुरू झाल्यावर हा प्रवास केवळ 10 तासांवर येणार आहे. त्यामुळे तब्बल 8 तासांचा वेळ वाचणार आहे.

हा वेळ वाचल्याचा फायदा दिल्ली-गोवा या प्रवासातही होणार आहे. या एक्सप्रेस वे मुळे दिल्ली-गोवा प्रवासातील वेळ तब्बल 15 तासांनी घटणार आहे.

Delhi-Mumbai Express Way
Delhi Metro in Goa: दिल्ली मेट्रो थेट गोव्यातील बीचवर? जाणून घ्या काय आहे प्रकरण

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे ला दिल्लीतून थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. लिंक एक्सप्रेसवे द्वारे दिल्ली, गाझियाबाद, नोएडा आणि फरिदाबादला डीएनडी फ्लायओव्हर आणि दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेशी जोडले जाणार आहे.

हा मार्ग तयार झाला की, दौसा आणि जयपूर येथून येणाऱ्या जाणाऱ्यांना गुरूग्राम मार्गावरून जाण्याची गरज राहणार नाही. दाहोद सेक्शन वगळता या वर्षी डिसेंबरपर्यंत एक्सप्रेस वे वरील दिल्ली-बडोदा सेक्शन पूर्ण होईल.

दिल्ली-बडोदा सेक्शनमध्ये फरिदाबाद, वल्लभगड, सोहना, नूह, पलवल, अलवर, भरतपूर, दौसा, सवाई माधोपूर, टोंक, बुंदी, कोटा, मंदसौर, रतलाम, झाबुआ, दाहोद, लिमखेडा, पंच महल असा मार्ग असणार आहे.

सध्या दिल्लीतून रस्तेमार्गे गोव्याला जाण्यासाठी 34 ते 35 तासांचा कालावधी लागतो. दिल्लीहून मुंबईत पोहचायला 12 तास लागतील. तर मुंबई-गोवा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे पुर्ण झाल्यावर या मार्गावरून मुंबईतून गोव्यात पोहचायला केवळ 7 तास लागतील.

Delhi-Mumbai Express Way
INSV Tarini Returns: 'तारिणी'ची घरवापसी! 7 महिने, 6 जणांचा क्रू, 31 हजार किलोमीटर समुद्री प्रवासाचा थरार..

म्हणजेच दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे आणि मुंबई-गोवा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर दिल्ली-गोवा हा प्रवास 34 तासांवरून केवळ 19 तासांवर येईल. एकूण 15 तासांचा वेळ वाचेल.

जर एखाद्या व्यक्तीने आधी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाने आणि त्यानंतर मुंबई-गोवा द्रुतगती मार्गाने प्रवास केला तर ती 19 ते 20 तासांत गोव्यात पोहोचेल.

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या दिल्ली ते राजस्थान या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आधीच झाले आहे. तर मुंबई-गोवा महामार्गाचे काम फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. म्हणजे, पुढील वर्षी लोकांना दिल्ली ते गोवा हे अंतर अवघ्या 19 ते 20 तासांत पूर्ण करता येईल, अशी अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com