Delhi Metro in Goa: दिल्ली मेट्रो थेट गोव्यातील बीचवर? जाणून घ्या काय आहे प्रकरण

व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
Delhi Metro on Goa Beach
Delhi Metro on Goa BeachDainik Gomantak

Delhi Metro on Goa Beach: देशभरात विविध कारणांनी गाजणारी दिल्ली मेट्रो आता थेट गोव्याच्या बीचवर अवतरणार आहे. म्हणजे, दोन्ही राज्यांमध्ये असलेल्या मोठ्या अंतरामुळे ही बाब अशक्य वाटत असली तरी दिल्ली मेट्रोच्या प्रवाशांनीच ही बाब शक्य केली आहे.

Delhi Metro on Goa Beach
INSV Tarini Returns: 'तारिणी'ची घरवापसी! 7 महिने, 6 जणांचा क्रू, 31 हजार किलोमीटर समुद्री प्रवासाचा थरार..

खरं तर, देशाची राजधानी दिल्ली आणि तेथील मेट्रो रेल्वे, या मेट्रोचे प्रवासी हा दीर्घ लिखाणाचा विषय आहे. कारण दिल्ली मेट्रोबाबत काही ना काही घडामोडी नियमित घडत असतात.

नियमभंग, चुंबन घेणारे जोडपे, अश्लीलता, व्हिडिओ शुट करणे इत्यादी कारणांसाठी दिल्ली मेट्रो विविध कुप्रसिद्ध आहे. आता हे नवीन प्रकरणदेखील असेच आहे.

दिल्ली मेट्रोचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा दिल्ली मेट्रोच्या आतून घेतलेला व्हिडिओ आहे. त्यात मेट्रोच्या एका बाजूवर मेट्रोचा मार्ग आणि स्थळांची नावे दिसतात. या डिस्प्ले बोर्डवर कुणीतरी अज्ञाताने शेवटी 'गोवा बीच' हे नाव लिहिले आहे.

Delhi Metro on Goa Beach
Goa-Dehradun Flight: गोवा-देहरादून थेट विमानसेवेमुळे आध्यात्मिक पर्यटनाला मिळेल चालना

जणू ही मेट्रो दिल्लीतील एका ठिकाणाहून सुरू होऊन गोवा बीचपर्यंत जाते, असेच दाखवण्याचा प्रयत्न अज्ञातांनी या स्टिकरमधून केला आहे.

दिल्ली मेट्रोतील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 'तर अशा प्रकारे दिल्लीचे लोक आपले ट्रॅव्हल गोल्स पुर्ण करत आहेत,' असेही संबंधित युजरने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com