Union Home Minister Amit Shah
Union Home Minister Amit Shah Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या विकासासाठी पूर्ण बहुमताचे सरकार द्या: अमित शहा

दैनिक गोमन्तक

आगामी पाच राज्यातील निवडणूकीच्या पाश्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गोवा दौऱ्यावर आले आहेत. भाजपने गोव्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी आतापासून सुरुवात केली आहे. यातच आता गोव्याच प्रभारी आणि महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.

शहा म्हणाले, निवडणूकीच्या आगोदर आपले संमेलन होत आहे. मी तर गोव्याच्या जनतेला भेटण्यासाठी आलो आहे. गोव्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता होणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोव्याला 1961 स्वातंत्र्य मिळाले. ज्या महापुरुषांनी गोव्याला स्वातंत्र्य मिळळून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना मी नमन करतो. कॉंग्रेसच्या शासनकाळापेक्षा भाजपचा शासनकाळ कधीही वरचढ ठरु शकतो.

तसेच, राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी जनता आपल्या सदैव पाठिशी आहे. केंद्रात मोदींना पूर्ण बहुमताचे सरकार जनतेने दिल्यानंतर कलम 370 हटविण्यासारखा मोठा निर्णय घेतला. कॉंग्रेसच्या काळात फक्त नि फक्त भ्रष्टाचाराचा गाजावजा होत असल्याचे यावेळी नमूद करत शहांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.

शिवाय, कोरोनाला हरविण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने योग्य रणनितीनुसार पावले उचलली आहेत. देशाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर देश कसा असेल याची पूर्ण कल्पना मोदींनी केली आहे. गोव्यात 100 टक्के लसीकरणासाठी प्रमोद सावंत सरकारने योग्य रणनितीनुसार कार्य केले आहे. भगवान परशुरामाने गोव्याची निर्मीती केली. गोव्याला संपूर्ण विकसित करण्यासाठी राज्यात भाजपचे शासन आणणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, तालुका पंचायतींच्या निवडणूकीमध्ये भाजपला भरघोस यश मिळाले आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणूकीचा विजय बाकी आहे. मनोहर पर्रीकरांची आठवण केल्याशिवाय गोव्याची कल्पना आपण करु शकत नाही. केंद्रीय सरक्षंण मंत्री असताना पर्रीकरांनी आपल्या कार्यकाळात आपल्या जवानांचा सन्मान करण्यासाठी वन रॅंक वन पेन्शनचा महत्त्वपूर्ण निर्णय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली घेतला. तसेच मोदींच्या नेतृत्वाखाली आपण सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून आपण दहशतवाद्यांना जशाच तसं उत्तर दिले.

त्यानंतर आता राज्यात प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर गोव्याने प्रगती करण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात केली. आता गोव्याची विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून वार्षिक परिक्षेची वेळ आली असून पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याचा आपण संकल्प करत आहोत. देशातील आणि राज्यातील जनतेला बॅंकीग सेवेशी मोदींनी जोडण्यासाठी कार्य केले आहे. तसेच सात वर्षाच्या काळातच देशातील करोडो लोकांची घरे प्रकाशमान केली आहेत. कोरोना काळात मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय मोदी सराकरने घेतला. भारताच्या पासपोर्टची व्हल्यू वाढविण्याचे कामही पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. 2024 पूर्वीच 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी लवकरच पूर्ण करतील, असा विश्वासही यावेळी अमित शहांनी गोव्यात बोलताना व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT