Goa Tourist: खरे तर रशियन पर्यटकांचे (Russian Tourist) आवडते पर्यटन स्थळ गोवाच आहे. कारण तिथे कडाक्याची थंडी सुरू झाल्यावर या पर्यटकांना गोव्यातील किनाऱ्यावरील उबदार वातावरण साद घालते. मात्र केंद्र सरकारने (Central Govt.) आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी अजून देशाचे दरवाजे खुले न केल्याने रशियातून येणारा चार्टर पर्यटक यावेळी ईजिप्तकडे (Egypt) वळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गोव्यात दरवर्षी सरासरी 2.5 लाख चार्टर पर्यटक येत असतात यातील 70 टक्के पर्यटक राशियातून येतात. एका बाजूने भारतात आंतरराष्ट्रीय पर्यटकांवर बंदी (Ban on International Tourists) घातलेली असताना इजिप्तची दारे मात्र सर्वांसाठी खुली आहेत.
राज्याचे पर्यटन सचिव जे. अशोक कुमार यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. सर्व पर्यटकांसाठी नसले तरी निदान काही देशातील पर्यटकांसाठी तरी गोव्यात यायची परवानगी केंद्राकडून मिळवा अशी त्याना आम्ही विनंती केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यास आम्हाला काहीतरी चांगली खबर ऐकण्यास मिळणार अशी आम्हाला आशा आहे ',असे मत रशियन पर्यटकांना गोव्यात आणणाऱ्या सीटा ट्रॅव्हल्स या कंपनीचे गोव्यातील प्रमुख अर्नेस्ट डायस यांनी व्यक्त केले.
इजिप्तमध्ये गोव्यासारखेच गरम वातावरण असल्याने रशियन पर्यटक तिथे जाऊ शकतात अशी भीती गोव्यातील व्यावसायिकांनी व्यक्त केली. कोविडमुळे मागची दोन वर्षे गोव्यात विदेशी पर्यटक येणे जवळ जवळ बंद झाले आहे.
गोव्यात देशी पर्यटक येत असल्याने आणि त्यांना तारांकित हॉटेल्समधून चांगले पॅकेज दिले जात असल्याने गोव्यातील तारांकित हॉटेल्स धंदा करीत असली तरी या चार्टर पर्यटकांवर मुख्यतः अवलंबून असलेली लहान आणि मध्यम हॉटेल्सचा धंदा बसला आहे. त्यामुळे अशी कित्येक हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत.
गोवा ट्रॅव्हल अँड टुरिझम सलसंघटनेचे अध्यक्ष निलेश शहा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जोपर्यंत चार्टर पर्यटक येत नाहीत तोपर्यंत ही हॉटेल्स सुरू करून काही फायदा होणार नाही. चार्टर पर्यटक नसल्याने मागची दोन वर्षे हे हॉटेलवाले नुकसानीत आहेत. आंतरराष्ट्रीय विमाने कधी सुरू केली जातील त्याची तारीख जाहीर करा अशी विनंती आम्ही सरकारला वारंवार केली आहे. मात्र अजूनही ती जाहीर केली जात नाही. इजिप्त व अन्य देशांनी कधीचेच पर्यटकांसाठी दरवाजे खुले केले आहेत. भारतातही ते व्हावेत अशी आमची इच्छा आहे असे शहा म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.