गोव्यात तृणमूलने लोकशाहीचा तमाशा चालवलाय: देवेंद्र फडणवीस

पहिला देश नंतर मी अशी भारतीय जनता पक्षाची शिकवण आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisDainik Gomantak

आगामी पाच राज्यातील निवडणूकीच्या पाश्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गोवा दौऱ्यावर आले आहेत. भाजपने गोव्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी आतापासून सुरुवात केली आहे. यातच आता गोव्याच प्रभारी आणि महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.

Devendra Fadnavis
जो गोवा जिंकतो, तो दिल्ली जिंकतोच: काँग्रेस नेते चिदंबरम

फडणवीस म्हणाले, खोटं बोला पण रेटून बोल अशी आम आदमी पार्टी आहे. कोणत्याही प्रकारची जबाबदारी न घेता आम आदमी पक्ष दिल्ली पुरताच मर्यादित आहे. आणि त्यातच आता गोव्यात ममता दिदींच्या तृणमूल पक्षाने लोकशाहीचा तमाशा सुरु केला आहे. पहिला देश नंतर मी अशी भारतीय जनता पक्षाची शिकवण आहे. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता देशाच्या विकासासाठी काम करणारा आहे. गोवा असा प्रदेश आहे जिथे लोकं गुण्या गोविंदाने नांदतात. आधूनिक गोव्याचे शिल्पकार मनोहर पर्रीकरांपासून ते आत्ताचे प्रमोद सावंत यांनी केवळ राज्यातील जनतेचं कल्याणचं केले आहे. गोव्यात आम्हाला जनतेचा विकास करण्यासाठी हवी आहे. गोव्यात रोजगाराची निर्मीती झाली पाहिजे मात्र गोव्याची संस्कृतीचे रक्षणही झाले पाहिजे भाजपा काम करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजनांमुळे देशाची विकास झाला आहे. देशाचा आर्थिक विकास उत्तमपध्दतीने होत असल्याने GDP दरामध्ये वृध्दी होत आहे. ५५ टक्के नागरिकांना बॅकिंग सेवांशी जोडले गेले आहे. आपण जर भारताच्या आर्थिक पाहणीची अहवाल बघितला तर आपल्या लक्षात येईल की, मोदींनी देशाच्या विकासदरामध्ये आपले भरभक्कम योगदान दिले आहे. सर्वसामान्यांना आर्थिक फायदा मिळावा यासाठी पंतप्रधान दिवस रात्र काम करत आहेत.

Devendra Fadnavis
Goa Politics: समविचारी पक्षांना युतासीठी 'भाजपा'ची दारे खुली

तसेच, केंद्राने 100 कोटी लोकांचं लसीकरणासाठी लसीकरणाची मोहीमही राबविली आहे. पंतप्रधानांनी कोविड काळात 20 लाख कोटीच्या योजना सुरु केल्या. तसेच या कोरोना काळात 85 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले. केंद्राने मेक इन इंडिया , स्टार्टअप योजना सारखे अनेक योजना सुरु केल्या नागरिक त्या योजनांचा लाभ घेत आहेत. मोदीमुळे भारत बदलतोय भाजपामुळे गोवा बदलत असल्याचेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com