Goa Politics: समविचारी पक्षांना युतासीठी 'भाजपा'ची दारे खुली

भाजपा पक्षाचा निवडणुकीतील आघाडीचा चेहरा म्हणून डॉ. प्रमोद सावंत हेच असणार आहेत आणि तेच गोव्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : आमचा पक्का निर्णय झाला आहे. भाजपा (BJP) पक्षाचा निवडणुकीतील (Goa Election) आघाडीचा चेहरा म्हणून डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) हेच असणार आहेत आणि तेच गोव्याचे पुढचे मुख्यमंत्री (Goa CM) असतील. कुठल्याही राजकीय पक्षात अंतर्गत मतभेद असू शकतात; पण आमच्या भाजपा पक्षाचा संयुक्तिक आवाज हा एकच असायला हवा, असे आम्ही भाजपा आमदारांना सांगितले आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत आणि एकत्रपणेच पुढे जावू, असे भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
पर्यटकांची चार्टर विमानाने 15 ऑक्टोबर पासून गोव्यात उतरणार

स्थानिक पक्षांसोबत युती करणे हे नेहमीच दोन्ही पक्षांच्या हिताचे असते. पण म्हणून आम्ही कधीच युतीसाठी तगादा लावलेला नाही. गोव्यातील येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढून सरकार स्थापन करण्याचे आम्ही ठरवले आहे; पण मगो किंवा इतर समविचारी पक्षांना युतीसाठी आमचे दरवाजे खुले होते आणि आहेत असेही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी गोवा भेटीदरम्यान स्पष्ट केले.

त्याचबरोबर गोव्यासह भाजपच्या इतर राज्यांतील स्थितीविषयीही फडणवीस यांनी मोकळी चर्चा केली. बिहारमध्ये जनता दल युनायटेडशी भाजपाशी युती होती. निवडणुकीत आम्ही दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना फायदा होईल असा विचार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर पक्षांच्या नेत्यांच्या सभा आयोजित केल्या होत्या. रणनीती आखून एकजूटिने काम केले आणि तिथे आम्हाला यश मिळाले. आगामी गोवा विधानसभा निवडणूकीसाठीही आम्ही रणनीती आखलेली आहे. त्याप्रमाणे गोव्यात काम होईल आणि भाजपला निश्चितपणे 22पेक्षा अधिक जागाही मिळतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

मनोहर पर्रीकर यांच्यासारखे नेते गोव्याला लाभले ते यावेळी सोबत नाहीत याची उणीव असेल. मात्र विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गोव्याचे प्रशासन व्यवस्थितपणे हाताळत आहेत. तेच आमच्या भाजपा पक्षाचा निवडणुकीचा चेहरा असणार आहेत. आणि गोव्याचे पुढचे मुख्यमंत्रीही तेच असतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजपशी एकनिष्ठ राहणाणाऱ्यांना योग्य वेळी योग्य ते पद मिळणार. इथे सर्वांचा सन्मान होतो, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

Devendra Fadnavis
'काँगेस' हाच खरा आमचा विरोधक: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दरम्यान, काही पक्षाचे आमदार सरकार किंवा पक्षाला हानी पोहोचेल, अशी विधाने बाहेर करत असतात. या सर्वांशी माझी चर्चा झाली आहे. अंतर्गत मतभेद असतील किंवा गैरसमज असतील तर ते बंद दाराआड सोडवता येतात असा समजूतीचा सुर लावत भाजपा आमदारांबदद्ल नाराजीही त्यांनी व्यक्त केली. जनतेला तुम्ही आश्वासक सरकार देत असता. त्यामुळे लोकांसमोर सर्वांचा एकच सूर आणि एकजूटच दिसायला पाहिजे, हा राजकारणाचा अत्यावश्यक नियम आहे. गोव्यातील काही आमदारांचे काम इतके चांगले आहे की त्यांना चांगले भविष्य आहे. त्यामुळे सर्व एकत्र राहून निवडणुकीला सामोरे जातील आणि पुढील सरकारही स्थापन करतील, असे फडणवीस म्हणाले.

समविचारी पक्षांसाठी दारे खुली

आम्ही कधीच कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही, असे उच्चार काढले नाही. स्वबळावर निवडणूक लढू शकतो, एवढा भाजप आज गोव्यात प्रबळ आहे. पण समविचारी पक्षांशी युतीसाठी भाजपाचे दरवाजे खुले आहेत. तेव्हा चर्चा करूनच पुढचे निर्णय घेतले जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com