Death  Dainik Gomantak
गोवा

Margao News: कचरा गोळा करणारा युवक विजेच्या धक्क्याने ठार

जीवंत वीज तारेवर पाय पडल्याने दुर्घटना

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News मडगावातील मुख्य बाजाराच्या ठिकाणी जुन्या भाटीकर हायस्कूलजवळ विजेचा धक्का लागून एका अज्ञात युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा युवक या ठिकाणी कचरा गोळा करण्याचे काम करत होता. यावेळी विद्युतवाहिनीवर त्याचा पाय पडल्याने तत्काळ जागीच त्याचा मृत्यू झाला.

ही दुर्घटना शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. याची माहिती मिळाल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची तपासणी केली असता, येथील काही परिसर विद्युतभारीत असल्याचे त्यांना दिसून आले.

कचरा गोळा करणाऱ्या युवकाचा संपर्क विद्युतभारित वस्तूशी आल्याचे एका वीज अभियंत्याने सांगितले. हा वीजप्रवाह 24 तास सुरूच होता, असेही तो म्हणाला.

माजी नगरसेवक दामोदर नाईक म्हणाले की, मी नगरसेवक असताना येथील साईन बोर्डच्या परवानगीची तपासणी करण्याची विनंती तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना केली होती.

एकाला नोटीस

येथील एका दुकानातील विजेची तार  घटनास्थळी जमिनीवरच पडली होती. त्या युवकाचा पाय त्यावर पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली.

ते म्हणाले की, यात वीज खात्याची काहीच चूक नाही. कारण विजेचे पॅनेल व्यवस्थित होते. त्यांनी नंतर  वीज खात्याच्या अभियंत्यांशी संपर्क साधला आणि  त्या दुकानदाराला नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

धोकादायक साईन बोर्ड हटवा!

माजी नगराध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांनीही येथील साईन बोर्ड काढण्याची मागणी केली आहे. यापुढे विद्युत जोडणी असलेल्या साईन बोर्डला परवानगी देताना अभियंत्यांनी बोर्डच्या जोडण्यांची तपासणी करावीे.

या ठिकाणी काही आस्थापनांनी थेट वीज खांबावरून जोडणी घेतली असून ते बेकायदेशीर आहे का, याचीही तपासणी करावी, अशी मागणी काहीजणांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: झटपट श्रीमंत होण्याची संधी! 'या' राशींसाठी मंगळाचे गोचर ठरणार 'वरदान'; मात्र काही लोकांनी राहावे सावधान

Khandola: कातळावर फुलवले नंदनवन! गोव्यातील ज्येष्ठ शेतकऱ्याने घडवला चमत्कार

Drum Circle Goa: गोव्याचा निळाशार समुद्र, लाटांची गाज; किनाऱ्यावर रंगणारी तालवाद्यांची मैफिल ‘ड्रम सर्कल’

ICU मध्ये असलेल्या मोरोक्कोच्या महिलेवर गोव्यात बलात्कार, सोलापूरच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला अटक

Goa Pollution Control: नियंत्रण मंडळाचे मोठे पाऊल! किनारी, औद्योगिक भागातील प्रदूषण रोखण्यासाठी होणार तपासणी मोहीम

SCROLL FOR NEXT