Amthane Dam: मगरीच्या हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

मुलांचा आधार हरपला : आमठाणे धरणावरील अडीच वर्षांतील दुसरी थरारक घटना
women dragged into Amthane Bicholim Dam while washing clothes
women dragged into Amthane Bicholim Dam while washing clothesDainik Gomantak
Published on
Updated on

Unfortunate death of a woman in a crocodile attack आमठाणे धरणात मगरीने केलेल्या हल्ल्यात संगीता बाबलो शिंगाडी (४८) या महिलेचा मृत्यू झाला. धनगर समाजातील ही महिला आमठाणे धरणापासून जवळच सावरधाट भागात राहात होती.

ही घटना आज (शनिवारी) दुपारी पावणेएकच्या सुमारास वडावलच्या बाजूने घडली. महिलेचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याबाहेर काढला. अडीच वर्षांतील ही दुसरी घटना आहे.

या महिलेला दोन मुले आणि एक मुलगी आहे. काही महिन्यांपूर्वीच तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ही तिन्ही मुले आता निराधार झाली आहेत. डिचोली पोलिस आणि अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच, जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

शैलेश गावडे, लिडींग फायर फायटर राजन परब यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी यांत्रिक बोटीच्या साहाय्याने शोध मोहीम सुरू केली. अर्ध्या तासातच संगीताचा मृतदेह हाती लागला.

या मोहिमेत गीतेश नाईक, अमोल नाईक (चालक ऑपरेटर) विशांत वायंगणकर, आर. टी. गावस, एम. बी. देसाई या जवानांनी भाग घेतला. डिचोली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला आहे.

women dragged into Amthane Bicholim Dam while washing clothes
Mahadayi Water Dispute: सागराच्या साक्षीने म्हादई नदी वाचविण्याची साद

यापूर्वी पर्यटकाचा गेला बळी

गेल्या चार वर्षांपासून आमठाणे धरणात मगरीचा संचार आहे. तसे सूचना फलकही जलस्रोत खात्याने धरण परिसरात लावले आहेत.

अडीच वर्षांपूर्वी नववर्ष साजरे करण्यासाठी आमठाणे धरणावर आलेला राजस्थानातील 25 वर्षीय पर्यटक आंघोळ करताना त्याला मगरीने पाण्यात ओढून नेले होते. दोन दिवसांनी त्याचा मृतदेह मिळाला. मगरीने त्याचा एक पाय तोडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com