Mahadayi Water Dispute: सागराच्या साक्षीने म्हादई नदी वाचविण्याची साद

म्हादई नदीबाबत जागरूक राहणे गोमंतकीयांचे कर्तव्य आहे- हेमा सरदेसाई
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak

Mahadayi Water Dispute विविध क्षेत्रातील कलाकार, साहित्यिक, राजकीय नेते, बिगर सरकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि म्हादईप्रेमींनी आज, शनिवारी अरबी समुद्राच्या किनारी हजारोंच्या संख्येने एकत्र येत मानवी साखळी तयार करीत ‘म्हादई’ वाचविण्याची साद घातली. या जनआंदोलनाद्वारे म्हादईबाबतची लोकचळवळ अधिक दृढ करण्याचा निश्‍चय करण्यात आला.

राज्य सरकारला पुन्हा जागे करण्यासाठी आणि कर्नाटकात नव्याने निवडून आलेल्या काँग्रेस सरकारलाही ‘म्हादई बचाव''चा लढा सुरूच राहील, हा संदेश या मानवी साखळीतून देण्यात आला. म्हादई बचाव, गोवा बचाव आघाडी, हेरिटेज ॲक्शन ग्रुप, ऑर्थिव्हीस्ट कलेक्टिव्ह, अभिव्यक्ती सांस्कृतिक संघ, यासारख्या समविचारी संस्थांनी एकत्रित येऊन म्हादई संवर्धनासाठी जनजागृती आणि चळवळ सक्षम करण्याकरिता हा जागरोत्सव आयोजित केला होता. दुपारी तीन वाजल्यापासूनच करंजाळेपासून मिरामार किनाऱ्यावर कार्यकर्ते जमले होते. काही कार्यकर्त्यांनी मांडवी जेटी येथे म्हादई बचावच्या घोषणा दिल्या.

Mahadayi Water Dispute
Mormugao News: रेल्वे प्रशासनाला 'ते' काम थांबवण्याचे पालिकेचे आदेश

लेखी उत्तर द्या!

म्हादई नदीबाबत जागरूक राहणे गोमंतकीयांचे कर्तव्य आहे. म्हादई नदीच्या प्रश्नाबाबत आम्ही आमची चिंता गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. म्हादई नदी वाचवण्याचे आश्वासन आम्हाला अधिकृत लेखी दस्तावेजात हवे आहे.

- हेमा सरदेसाई, गायिका.

विद्यमान सरकारने राजकीय स्वार्थासाठी म्हादई नदी कर्नाटकला विकली. म्हादई नदीसाठी एकजूट दाखवण्यासाठी मानवी साखळीचा हा उत्तम उपक्रम होता. यासाठी गोमंतकीय मोठ्या संख्येने बाहेर पडले, ही कौतुकास्पद बाब आहे.

- विजय सरदेसाई, आमदार.

Mahadayi Water Dispute
BCCI: गोव्याच्या सोहमची विद्यापीठ क्रिकेट शिबिरात निवड

...हे तर ट्रबल इंजिन सरकार

म्हादई जागर सुरूच राहील. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी यात भाग घेतला. काँग्रेसचे नेहमीच ‘गोवा प्रथम’ हे धोरण आहे. कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला बेकायदेशीररित्या मंजुरी देणारे हे ‘ट्रबल इंजिन'' भाजप सरकार आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

अमित शहांना प्रत्युत्तर

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार सभेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या सहमतीने म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्पाला डीपीआर मंजुरी देऊन येथील जनतेचा पाणी प्रश्‍न सोडविल्याचे जाहीरपणे सांगितले होते.

त्याशिवाय शहा यांनी गोव्यातील जनता शांत बसते, या त्यांच्या मताला आजच्या मानवी साखळीने प्रत्युत्तर दिले. या मानवी साखळीत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आपचे नेते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

Mahadayi Water Dispute
Pickleball Tournaments 2023: गोव्याच्या नोएलने पटकावले रौप्यपदक

हेमा सरदेसाईंच्या गीताची भुरळ

प्रसिद्ध गोमंतकीय गायिका हेमा सरदेसाई यांनी ‘नितळ आणि शीतळ उदक तुझे, व्हावता तू गोंयच्या नदिनी, म्हादई आमची माय, म्हादई आमची माय’, हे सुरेल गीत सादर करून उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.

तसेच प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना इम्फाना कुलकर्णी यांनी टीमसह मांडवी नदीमध्ये बोटीत संगीतासह नृत्य सादर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com