Colvale Jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: ड्रग्स तस्करीप्रकरणी कोलवाळ कारागृहाचे जेलर, साहाय्यक उपनिरीक्षक निलंबित; व्यवस्थापनाकडून माहिती देण्यास नकार

Colvale Jail Police Suspension: जेलर कृष्णा उसगावकर आणि साहाय्यक उपनिरीक्षक सूरज तोरस्कर हे ड्युटीवर असताना कारागृहात मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी करताना कारवाई झाली होती.

Sameer Panditrao

Colvale Jail Police Suspended For Drugs Smuggling

पणजी: कोलवाळ कारागृहात अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी जेलर कृष्णा उसगावकर तसेच तुरुंग सुरक्षा यंत्रणेतील आयआरबी पोलिस साहाय्यक उपनिरीक्षक सूरज तोरस्कर या दोघांना सेवेतून निलंबित केले आहे.

तस्करीसंदर्भातील चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, याप्रकरणी अधिक माहिती देण्यास तुरुंग अधिकाऱ्यांनी नकार दिला.

कोलवाळ कारागृहात तुरुंग अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीवेळी कैद्यांच्या खोल्यांमध्ये ड्रग्स तसेच मोबाईल फोन सापडत असल्याने तुरुंग कर्मचारी आणि सुरक्षा पोलिस तस्करीमध्ये सामील असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे यावर पाळत ठेवण्यात आली होती. जेलर कृष्णा उसगावकर आणि साहाय्यक उपनिरीक्षक सूरज तोरस्कर हे ड्युटीवर असताना कारागृहात मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी करताना कारवाई झाली होती.

या प्रकरणाची चौकशी कारागृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली असता जेलर तसेच सुरक्षेसाठी प्रवेशद्वारावर नेमलेले पोलिस कर्मचारी या तस्करीला जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.

ड्रग्स तस्करीप्रकरणी अतिरिक्त तुरुंग महानिरीक्षक स्नेहल गोलतेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जेलर कृष्णा साळगावकर यांच्या निलंबनाची माहिती दिली. मात्र, या कारवाईमागील माहिती देण्यास नकार दिला. ड्युटीवर असताना शिस्तभंग केल्यामुळे तुरुंग नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येत आहे. जेलरना कोणत्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे ही माहिती आपण उघड करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कारागृह प्रवेशद्वारावर सुरक्षेसाठी आयआरबी बटालियनचे पोलिस कर्मचारी तैनात केले आहे. कारागृहात वारंवार होणारी ड्रग्स तस्करी ही तुरुंगाधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय शक्य नाही. त्यामुळे यासंदर्भात केलेल्या चौकशीत ज्या दिवशी ड्रग्स तस्करीप्रकरणी कारवाई झाली होती, तेव्हा ड्युटीवर साहाय्यक उपनिरीक्षक सूरज तोरस्कर आणि इतर पोलिस कर्मचारी होते.

कारागृहात ड्रग्सचा मोठा साठा सापडल्यानंतर केलेल्या चौकशीत ड्युटीवरील तुरुंगाधिकारी आणि पोलिस त्यात गुंतल्याचे समोर आल्याने जेलर तोरस्करला काल निलंबित केले होते, तर पोलिस कर्मचाऱ्याला आज निलंबित करण्यात आले. जेलर कृष्णा उसगावकर यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रक्षकच बनलेत संदेशवाहक

कोलवाळ कारागृहात तस्करीची अनेक प्रकरणे यापूर्वी उघडकीस आली आहेत. ही प्रकरणे तुरुंग अधिकाऱ्यांकडून उघड केली जात नाहीत. ही प्रकरणे दडपण्यात येतात. एखाद्या कैद्याकडे ड्रग्स वा फोन सापडला तर तो जप्त केला जातो. मात्र, त्याची सखोल चौकशी होत नाही. निलंबनाची कारवाई होते. मात्र ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे तुरुंग कर्मचारी वा सुरक्षा रक्षकांना भय राहिलेले नाही. काही तुरुंग कर्मचारी व सुरक्षा रक्षक हे कैद्यांचे संदेशवाहक बनले आहेत, अशी माहिती मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT