Goa Drugs Case: गोव्यात ड्रग्जविक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू! रात्रीच्या गस्तीत वाढ; आठवडाभरात 3 प्रकरणांची नोंद

Goa Crime: नववर्षापासून गुन्हे अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने किनारपट्टी तसेच अंतर्गत भागात ड्रग्जविक्रेते तसेच माफियांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे.
Goa Latest Crime News
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa police drug operations

पणजी: नववर्षापासून गुन्हे अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने किनारपट्टी तसेच अंतर्गत भागात ड्रग्जविक्रेते तसेच माफियांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या आठवडाभरात तीन ड्रग्ज प्रकरणांची नोंद केली आहे.

क्राईम ब्रँचच्या पोलिस पथकाने गिरी येथील ग्रीन पार्क हॉटेलजवळ एमडीएमए ड्रग्जप्रकरणी विकास वासू राठोड (२० वर्षे, हणजूण) याला काल उत्तररात्री अटक केली. त्याच्याकडून सुमारे ६.६१३ ग्रॅम एमडीएमए ड्रग्ज जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे १ लाख १५ हजार रुपये आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

Goa Latest Crime News
Goa Drugs: गोमंतकीय युवकांना ड्रग्ज विक्रीचा विळखा! शाळा-कॉलेजपर्यंत पोहोचली कीड; वाचा धक्कादायक रिपोर्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँचने गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या गस्तीत वाढ केली आहे. रेस्टॉरंट्स तसेच पब्सच्या परिसरात काही ड्रग्ज विक्रेते पर्यटकांना गाठून त्यांना ड्रग्ज विक्री करत असल्याने त्यावर कडक नजर ठेवण्यात येत आहे. गिरी येथील ग्रीन पार्क हॉटेलजवळील वानसीवाडा येथे एक तरुण मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद उभा असलेला दिसून आला. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने पोलिस पथकाने त्याला हटकले. त्याने सुरुवातीला पोलिसांच्या चौकशीला समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या एका पॉलिथिन पॅकेटमध्ये गुलाबी व खाकी रंगाची पावडरआढळून आली.

Goa Latest Crime News
Goa Drugs Cases: चिंताजनक! गोव्यात गांजाचा विळखा घट्ट होतोय, शाळकरी विद्यार्थीही आहारी; जपान, जर्मनीतील नागरिकांना अटक

ड्रग्ज तपासणी

ड्रग्ज तपासणी किटच्या मदतीने त्याची चाचणी केली असता ते एमडीएमए पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com