Bhoma Road Project Goa Dainik Gomantak
गोवा

Bhoma Project: भोम प्रकल्पावरून ग्रामस्थ मंत्रालयात दाखल; "60 मीटर नव्हे, फक्त 25 मीटरचा रस्ता बांधणार" मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Bhoma villagers protest: मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी उड्डाणपूल न बांधता केवळ बायपास बांधावा असे ठामपणे सांगितले आणि सरकारला प्रस्तावित प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली

Akshata Chhatre

भोम: प्रस्तावित प्रकल्पाला विरोध करत भोम येथील ग्रामस्थांनी सोमवारी (दि.२१) मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि भोम येथे उड्डाणपूल नको आणि बायपास करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीये. मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी उड्डाणपूल न बांधता केवळ बायपास बांधावा असे ठामपणे सांगितले आणि सरकारला प्रस्तावित प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देकील स्पष्टीकरण दिले आहे.

मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, भोम वासियांना त्यांनी कार्यालयात येऊन भेटायला सांगितलं होतं, त्यानुसार जवळपास ७० लोकांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेतली. दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रेझेन्टेशनमधून ग्रामस्थांना प्रस्तावित प्रकल्पाची माहिती दिली.

या प्रकल्पामुळे देवळाला कुठलीही हानी होणार नाही, त्यामुळे चुकीच्या गैरसमजांना बळी पडू नये अशी विनंती त्यांना करण्यात आली आणि ही बाब स्थानिकांना देखील पटल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

भोम येथे ६०मीटरचा रस्ता तयार केला जाईल अशी चुकीची माहिती पसरवली जातेय, मात्र हा देखील गैरसमज असून इथे फक्त २५ मीटर लांबीचा रस्ता तयार केला जाईल असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं.

एवढंच नाही तर या प्रस्तावित प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात घरं स्थलांतरित होणार असल्याची भीती ग्रामस्थांच्या मानत होती, पण असं काहीही होणार नसून केवळ चार घरं हलवण्यात येतील पैकी एकाच मालकाचं दुकान व घर असून या सर्वाना वेगळी जागा देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

मंगळवारी अभियंते स्वतः भोम येथे भेट देऊन ग्रामस्थांना प्रकल्पाची जागा खूण करून दाखवतील, या मार्किंग्समुळे ग्रामस्थांना आणखीन योग्य पद्धतीने माहिती मिळेल आणि त्यांचे गैरसमज दूर होतील असं मुख्यमंत्री म्हणालेत.

हा प्रकल्प खूप जुना असून आता तो पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे,त्यामुळे ग्रामस्थांनी अभियंत्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. मंदिराच्या तळीचं पुनर्निर्माण कारण्यासाठी सरकार मदत करेल तसेच गाडेवाल्यांना देखील विशेष सोय करून दिली जाईल, परिणामी लोकं सरकारला सहकार्य करतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT