Bhoma Old Goa 4-laning: 'चौपदरी रस्ता नको, बगल मार्ग करा, गावाचे अस्तित्व टिकवा', सरकार - भोमवासीय संघर्ष अटळ

Bhoma To Old Goa 4-laning: बाणस्तारीचा सध्याचा पूल दुहेरी वाहतुकीचा असून हा पूल चौपदरी होणार आहे.
Bhoma Old Goa 4-laning
Bhoma Old Goa 4-laning
Published on
Updated on

फोंडा: फोंडा-पणजी महामार्गावरील भोम ते जुने गोवेपर्यंतच्या चौपदरी रस्त्याच्या कामासाठी केंद्र सरकारने एकूण १ हजार ६० कोटी २१ लाख रुपये मंजूर केले असून या कामाला आता लवकरच सुरवात होणार आहे.

मात्र भोम गावातून चौपदरी रस्ता नकोच, बगल मार्ग उभारा आणि गावाचे अस्तित्व टिकवा, अशी मागणी करणाऱ्या भोमवासीयांचा विरोध डावलून जोर जबरदस्तीने या कामाला सुरुवात होणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकार विरोधात भोमवासीय असा संघर्ष अटळ असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Bhoma Old Goa 4-laning
Goa Schools Reopened: अखेर इतिहास घडला! गोव्यात पहिल्यांदाच एप्रिलमध्ये सुरु झाल्या शाळा, पालकांकडून मात्र विरोध

खुद्द केंद्रीय रस्ते महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगाव ते पणजी चौपदरी महामार्ग निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची सूचना संबंधित खात्याला केली असून बराच काळ रखडलेल्या भोम ते जुने गोवे रस्त्यासाठी प्राधान्य दिल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. बाणस्तारीचा सध्याचा पूल दुहेरी वाहतुकीचा असून हा पूल चौपदरी होणार आहे.

खांडेपार ते पणजी हा चौपदरी महामार्ग पूर्ण करण्यात येत असून सध्या फोंडा ते प्रियोळ व त्यापुढे भोम ते खोलीं जुने गोवे पर्यंतच्या रस्त्याचे काम रखडलेले आहे. हा भाग अरुंद असून या मार्गावर कायम वाहतूक कोंडी होत असते, ज्याचा त्रास स्थानिकांबरोबर पर्यटक व मालवाहतूकदारांना होतो.

Bhoma Old Goa 4-laning
Goa Congress: 'हे भाजपचं रामराज्य नाही, प्रभू श्रीरामाचा राजकारणासाठी वापर थांबवा', पणजीकरांनी CM सावंतांना विचारले 4 प्रश्न

गावाबाहेरून रस्ता करा !

आम्हाला चौपदरी रस्ता हवा आहे; पण तो गावातून नव्हे, तर गावाबाहेरून, असा पुनरुच्चार भोमवासीयांनी केला आहे. आमचा लढा हा गाव वाचवण्यासाठी, येथील संस्कृती रक्षणासाठी आहे आणि गावाबाहेरून जर चौपदरी रस्ता करणे शक्य आहे तर मग सरकारचा हा अट्टहास का, असा सवाल भोमवासीयांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com