Bhoma Road: 'भोम' बगलमार्गासंदर्भात लोकांमध्ये अनेक गैरसमजुती! मंत्रालयात येऊन माहिती घ्या; मुख्यमंत्र्यांचे ग्रामस्थांना आवाहन

Cm Pramod Sawant: आश्वासनावर मधलावाडा भोमवासीयांनी समाधान मानत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि सोमवारी मंत्रालयाला भेट देण्याची तयारी दर्शवली.
Cm Pramod Sawant, Bhoma Road Issue
Cm Pramod Sawant, Bhoma Road IssueDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: भोम गावातून नियोजित बगल मार्गासाठी पर्याय सुचवा. मी त्याची त्वरित कार्यवाही करतो; पण विस्तारीकरणात गावातील एकही घर किंवा मंदिराचा एक तुकडाही जाणार नाही, याची मी खात्री देतो. बायपास रस्त्यासंदर्भात तांत्रिक विभागाशी चर्चा करा.

त्यासाठी सोमवारी सकाळी १०.३० वा. मंत्रालयात तांत्रिक विभागाकडून सर्व माहिती व मार्गदर्शन केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भोमवासीयांना साखळी येथे दिली.

मधलावाडा-भोम येथील सुमारे ५० लोकांनी शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास साखळी रवींद्र भवनजवळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.

Cm Pramod Sawant, Bhoma Road Issue
Bhoma Road Issue: "देव खाप्रेश्वराला बाजूला केले, आता आमच्या देवदेवतांनाही बाजूला करण्याचे षडयंत्र सुरू", भोमवासीयांना सावध राहण्याचं आवाहन

सध्या या बगलमार्गासंदर्भात लोकांमध्ये अनेक गैरसमजुती पसरविल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी मंत्रालयात भोम येथील लोकांनी यावे. नियोजित बगलमार्ग कशा पद्धतीने साकारणार, याची संपूर्ण माहिती तांत्रिक पथक लोकांना देणार आहे. जर एखादे घर, मंदिराचा भाग किंवा अन्य वास्तू या बगलमार्गामुळे भंग होत असेल, तर तो भाग किंवा ती वास्तू वगळून बायपास रस्ता साकारण्यास आम्ही तयार आहोत.

Cm Pramod Sawant, Bhoma Road Issue
Bhoma Old Goa 4-laning: "भोम चौपदरीकरणात एकही घर, मंदिराला धोका नाही" मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

त्यासाठी लोकांनी सकारात्मकपणे सरकारला साथ देत सर्वप्रथम या बगलमार्गाचा आराखडा समजून घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या आश्वासनावर मधलावाडा भोमवासीयांनी समाधान मानत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि सोमवारी मंत्रालयाला भेट देण्याची तयारी दर्शवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com