Canacona Dainik Gomantak
गोवा

Canacona: युवा पिढीसाठी गोकर्ण पर्तगाळी मठात ॲम्‍फी थिएटर, युवकांना करणार आकर्षित; 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व कामांची पूर्तता

gokarna partagali math anniversary: गोकर्ण पर्तगाळी मठाच्या वर्धापनदिनानिमित्त सुरू असलेली सर्व कामे २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे आयोजन समितीचे संयुक्त सचिव दिनेश पै यांनी सांगितले.

गोमंतक ऑनलाईन टीम

काणकोण: गोकर्ण पर्तगाळी मठाच्या वर्धापनदिनानिमित्त सुरू असलेली सर्व कामे २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे आयोजन समितीचे संयुक्त सचिव दिनेश पै यांनी सांगितले.

१२ हजार चौरस मीटर जागेत रामायण पार्क उभारण्यात येत आहे. याठिकाणी पूर्वी गोशाळा होती. त्याच ठिकाणी आधुनिकीकरणाचा एक भाग तसेच युवा पिढीला मठाकडे आकर्षित करण्यासाठी ॲम्‍फी थिएटर उभारण्यात येत आहे.

मठात रामनवमीसाठी येणाऱ्या मठानुयायींच्‍या निवासाची सोय केली आहे. त्‍यावेळी रथविधी होतो. त्याचा २० हजार भाविकांना आनंद लुटता यावा, यासाठी प्रशस्त मैदानाची निर्मिती केली आहे, असे दिनेश पै यांनी सांगितले.

नव्या प्रकल्पाची खासियत

दिल्ली येथील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कलाकार अनिल सुतार यांच्याकडून ब्राँझ धातूपासून ७७ फूट उंचीचा श्रीरामाचा पुतळा उभारण्यात येत आहे.

वीर विठ्ठल मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे. ३३० वर्षे जुन्या श्रीराम मंदिराचे नूतनीकरण व विस्तार करण्यात आला आहे.

स्वामीजी आरती करतात, त्यावेळी किमान चारशे मठानुयायांना बसून आराधना करता यावी, या उद्देशाने या मंदिराची बांधणी केली आहे.

शिवाय शिखर कलश, ताम्रपट यांची बांधणी केली आहे. मठात संस्कृत पाठशाळा होती. स्वामीजींच्या निर्देशानुसार तिचे नूतनीकरण करून व्याख्यात्यांसाठी स्वतंत्र निवासी खोल्या, वर्ग तसेच भटजींच्या निवासाची व्यवस्था केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; 'त्या' भावी नगरसेवकांना हवाय युरीचा आशीर्वाद!

Goa Live News: गोव्याच्या डॉ. अंजनेय कामतची भरारी! NEET-PG 2025 मध्ये राज्याचा प्रथम क्रमांक

IFFI Goa 2025: इफ्फीच्या उद्‍घाटनाच्या चित्रपटाचे सिनेकर्मींना आमंत्रण का नाही? 'फिल्म मेकर्स'चा सवाल; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

Goa Crime: दक्षिण गोव्‍यात सात दिवसांत चार अल्‍पवयीनांची अपहरणे, एका प्रकरणाचा छडा; तीन तपासाविना प्रलंबित

Education: भारतीय विद्यार्थ्यांचा कल करिअर केंद्रित शिक्षणाकडे, लंडनमधील विद्यापीठाचा परदेशातील शिक्षणाबाबत अहवाल

SCROLL FOR NEXT