Goa Police: बदलीच्‍या ठिकाणी रुजू व्‍हा,अन्‍यथा आता वेतन थांबवणार; पोलिस मुख्यालयाचा 'त्या' 68 पोलिसांना इशारा

goa police transfer action: बदलीचा आदेश आल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करणे आता पोलिस कर्मचाऱ्यांना महागडे ठरणार आहे.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बदलीचा आदेश आल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करणे आता पोलिस कर्मचाऱ्यांना महागडे ठरणार आहे. कारण, ६८ पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी पोलिस मुख्यालयाने सुरु केली आहे. या सर्वांनी नव्या ‘पोस्टिंग’ वर तत्काळ रुजू व्हावे, अन्यथा वेतन थांबवण्यात येईल, असा इशारा या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.

मुख्यालयाकडून जारी केलेल्या आदेशानुसार, संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी नव्या ‘पोस्टिंग’ वर त्वरित रुजू होणे बंधनकारक आहे. तसेच रुजू झाल्याचा अहवाल सादर केल्यानंतच त्यांचे वेतन नव्या ठिकाणावरूनच देण्यात येईल. उल्लेखनिय म्हणजे, या ६८ कर्मचाऱ्यांमध्ये चार उपनिरीक्षकांचा देखील समावेश आहे.

Goa Police
IFFI Goa 2025: "इफ्फीपर्यंत पोहोचावं कसं?" हे आहेत उत्तर-दक्षिण गोवा ते पणजीचे काही सोपे मार्ग; जाणून घ्या एका क्लिकवर

आदेशाची अवहेलना

पोलिस दलातील प्रशासकीय शिस्त आणि कायदा-सुव्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने गोवा पोलिस मुख्यालयाने हा निर्णय घेतला आहे. २०२० ते २०२५ या काळात जारी केलेल्या बदली आदेशांची वारंवार अवहेलना होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्यालयाला ही भूमिका घ्यावी लागली.

Goa Police
Goa Tourism: आखाती देशांतील पर्यटक आकर्षित करण्यासाठी गोवा सज्ज! थेट बहरीनमध्ये आयोजित केलाय रोड शो

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘पोस्टिंग’ला उशिर करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे काही महत्त्वाच्या पोलिस केंद्रांवर मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होत आहे. आदेशाचे काटेकोर पालन करणे सर्वांचे कर्तव्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com