Yuri Alemao  Dainik Gomantak
गोवा

'अहिंसेचा मार्ग महत्त्वाचा'! भाजप राजवटीत महात्मा गांधी, शास्त्रींचे विचार मागे पडताहेत; युरी आलेमाव यांची खंत

Yuri Alemao: महात्मा गांधी आणि शास्त्री दोन्ही महान व्यक्तींनी देशाला विचार दिला, त्यांचे विचार सध्याच्या सरकारच्या काळात मागे पडत आहेत, हे दुःखाची बाब असल्याचे मत युरी आलेमाव यांनी व्यक्त केले.

Sameer Panditrao

पणजी: इंग्रजी राजवटीविरोधात लढताना महात्‍मा गांधी यांनी देशाला जो अहिंसेचा व शांतीचा मार्ग दाखवला. तसेच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला.

या महात्मा गांधी आणि शास्त्री दोन्ही महान व्यक्तींनी देशाला विचार दिला, त्यांचे विचार सध्याच्या हुकूमशाही सरकारच्या काळात मागे पडत आहेत, हे दुःखाची बाब असल्याचे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले.

जुने गोवेतील महात्मा गांधींच्या पुतळा परिसरात आज दोन्ही महान व्यक्तींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी ते गेले होते. महात्मा गांधींच्या पुतळ्यास आणि शास्त्रींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांकडे बोलत होते.

ते म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. परंतु हे सरकार हुकूमशाहीसारखे वागत आहे. देशाला हुकूमशाही आणि धमकीच्या धोक्यांचा सामना करावा लागत असताना, सोनम वांगचुक सारख्या व्यक्तींना दडपले जात असताना, गांधीवादी तत्त्वांसह न्यायासाठी लढाईत एकत्र येण्याची नितांत गरज आहे.

काँग्रेस भवनात अभिवादन

सकाळी काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, काँग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. शेख, तुलियो डिसोझा यांच्यासह इतर मान्यवरांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chikhalim Bike Fire: सिग्नलला थांबलेल्या दुचाकीने अचानक घेतला पेट! दाबोळी - चिखली मार्गावर आगीचा थरार; दुचाकीस्वार बचावला

Goa ZP Election: 'सध्या लढा आहे तो भाजप विरुद्ध गोवा असा'! LOP युरींचे मत; काँग्रेस, आरजीपी, फॉरवर्ड निवडणूकीसाठी एकत्र

Rama Kankonkar: काणकोणकर हल्लाप्रकरणी मुख्य सूत्रधार 'जेनिटो'च! ऑनलाइन खिल्लीमुळे सुडाची सुपारी; 8 आरोपींविरुद्ध चार्जशीट

Pooja Naik: पूजा नाईकचा 'मोबाईल' तपासासाठी ‘फॉरेन्‍सिक’ कडे! पुराव्‍यांबाबत उत्‍कंठा वाढली; 'नार्को'विषयी मुख्यमंत्र्यांनी टाळले उत्तर

Horoscope: अडकलेली कामे पूर्ण होतील, प्रेमसंबंधात संवाद वाढेल; 'या' राशींच्या लोकांसाठी शुभ बातमीची शक्यता

SCROLL FOR NEXT