Sameer Amunekar
प्यारेलाल (गांधींचे सचिव) यांची बहीण. आईच्या विरोधानंतरही गांधीजींच्या कार्याशी जोडल्या गेल्या. डॉक्टर म्हणून गांधीजींच्या आरोग्यसेवेत महत्त्वाची भूमिका बजावली.
बंगाली वंशाच्या आभा यांचं लग्न गांधींचे पणतू कनू गांधी यांच्याशी झालं. गांधींच्या सभेत आभा भजन गात असत तर कनू फोटो काढत. गांधीजींवर गोळ्या झाडल्या तेव्हा आभा त्यांच्यासोबतच होत्या.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष. मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी गांधीजींना अटक झाल्यावर आंदोलनाचं नेतृत्व केलं. त्यांच्या कवित्वामुळे त्यांना “भारताची बुलबुल” म्हणूनही ओळखलं जातं.
राजघराण्यातील असूनही गांधीजींशी अतूट नातं जडलं. गांधींच्या सगळ्यात जवळच्या सत्याग्रही महिलांपैकी एक मानल्या जात. नेहमी सन्मानपूर्वक, सर्वांसोबत मिसळून राहणं हा त्यांचा स्वभाव.
रवींद्रनाथ टागोर यांच्या भाची.लाहोर दौऱ्यात गांधीजी त्यांच्याच घरी उतरले. पती रामभुजदत्त चौधरी तुरुंगात असताना गांधी आणि सरला यांच्यातील संबंध अधिक गहिरे झाले. गांधीजी त्यांना “अध्यात्मिक पत्नी” मानत असत.
गांधींच्या दूरच्या नातेवाईक. लहान वयातच गांधीजींकडे आल्या. गांधीजी त्यांना आपली नात मानत असत.
इंग्लंडमधील संगीतप्रेमी व निसर्गप्रेमी महिला. रोमेन रोलँड यांचं गांधी चरित्र वाचून प्रभावित होऊन भारतात आल्या. गांधीजींच्या विचारांनी इतकं आकर्षित झाल्या की आयुष्यभर त्यांचा मार्ग स्वीकारला. गांधीजींनी त्यांना “मीराबेन” हे नाव दिलं.
अमेरिकन महिला. फेब्रुवारी १९३३ मध्ये येरवडा तुरुंगात गांधीजींना भेटल्या. गांधीजींनी त्यांना साबरमती आश्रमात पाठवलं, जिथे त्यांचं इतर आश्रमवासीयांशी जवळीक निर्माण झाली.