Rahul Gandhi: राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला घेरले; 'मतदार याद्यांमध्ये जाणूनबुजून फेरफार...'

Rahul Gandhi’s allegations against CEC: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारताच्या निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत थेट मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारताच्या निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत थेट मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. 'आयोगाने जाणूनबुजून आणि लक्ष्य करून देशातील लाखो मतदारांची नावे मतदार यादीतून हटवली,' असा सनसनाटी आरोप त्यांनी गुरुवारी केला. हे आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे 'नकारता न येण्यासारखे पुरावे' आणि 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये प्रमाण असल्याचा दावाही त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी आपल्या आरोपांना बळकटी देण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचे उदाहरण दिले. त्यांनी म्हटले की, "कर्नाटकातील आलंद विधानसभा मतदारसंघामध्ये २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत ६,०१८ मते जाणीवपूर्वक वगळण्यात आली. आलंद हा काँग्रेसचा एक मजबूत मतदारसंघ आहे, म्हणूनच त्याला लक्ष्य करण्यात आले." महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही अशाच प्रकारे मतांची फेरफार करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Assembly Elections 2027
Rahul Gandhi

Rajnath Singh Demands Rahul Gandhi Apology
Impeachment Notice Against CEC Gyanesh Kumar
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com