BJP government's anti-people agenda Congress criticizes BJP  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात भाजपने शपथविधी तातडीने पूर्ण करावा, काँग्रेस आक्रमक

'भाजपच्या निवडणुकीतील जुमल्यांचा झाला पर्दाफाश'

दैनिक गोमन्तक

मडगाव : विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केल्याने अत्यंत असंवेदनशील व बेजबाबदार भाजप सरकारचा जनविरोधी अजेंडा पुन्हा एकदा लोकांसमोर आला आहे. भाजप नेत्यांच्या सोयीपेक्षा जनतेची सोय ही सर्वोपरि आहे, यासाठी गोव्यातील सरकारने शपथविधी कार्यक्रम तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस व आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.

इंधन आणि एलपीजी दरवाढ, तसेच गोव्यातील सरकारच्या शपथविधीला होणारा विलंब यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, कुंकळ्ळी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव आणि गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी एका संयुक्त निवेदनात भाजपच्या लोकविरोधी अजेंड्यावर टीका केली आहे.

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी 5 मार्च 2022 रोजी केलेल्या ट्विटचा संदर्भ देत, ज्यात त्यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर इंधनाच्या दरवाढीच्या अपेक्षेने लोकांना त्यांच्या इंधनाच्या टाक्या पूर्ण भरण्याचे आवाहन केले होते, युरी आलेमाव म्हणाले की काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा भाजपची पोलखोल केली आहे.

"प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उशीऱा होइना पण आपण पुन्हा एकदा भाजपच्या जुमल्यांची पूर्तता केली आहे. एलपीजीच्या (LPG) दरात प्रति सिलिंडर 50 रुपयांनी आणि इंधनाच्या दरात 80 पैशांची वाढ झाल्यामुळे आता स्मृती इराणींच्या उत्साही रोड शोची प्रतीक्षा आहे." असा टोला युरी आलेमाव यांनी हाणला. कार्यवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवीन सरकारचा शपथविधी सोहळा 28 मार्च 2022 रोजी आयोजित केलेल्या घोषणेवरही त्यांनी जोरदार टीका केली.

" प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर भाजप नेत्यांच्या सोयीपेक्षा गोव्यातील जनतेची सुविधा सर्वोपरि आहे. गोव्यातील जनतेला ताबडतोब पूर्ण सरकार (Government) हवे आहे. इव्हेंट मॅनेजमेंटवर होणारा फालतू खर्च थांबवा आणि राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये ताबडतोब शपथविधी घ्या" अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार स्थापन होण्या पूर्वीच पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरात वाढ करून प्रधानमंत्र्यांनी नागरिकांची क्रूर चेष्टा केली आहे असे कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर म्हणाले. "भाजपच्या निवडणुकीतील जुमल्यांचा पर्दाफाश झाला आहे." असे ते म्हणाले.

या दोन्ही नेत्यांनी जनतेला भाजपच्या (BJP) जनविरोधी अजेंड्याबद्दल प्रश्न विचारण्याचे आवाहन केले आणि भाजपच्या आमदारांनाही काटकसरीचे उपाय स्वीकारण्याची मागणी केली कारण राज्याची तिजोरी यापूर्वीच भाजप सरकारने रिकामी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT