मयेत आंदोलनाला वेगळे वळण; दोघांना अटक

ट्रकमालक-ग्रामस्थांमध्ये वाद
mayem movement takes a different turn; Both arrested
mayem movement takes a different turn; Both arrestedDainik Gomantak

डिचोली : गावातील अंतर्गत रस्त्याने नियमबाह्य खनिज वाहतूक नकोच, या भूमिकेशी ठाम असलेल्या मयेतील नागरिकांनी मंगळवारी रस्त्यावर उतरून खनिजवाहू ट्रक रोखून धरले. त्यातच स्थानिक ट्रकवाल्यांनी आंदोलनकर्त्यांच्या विरोधात भुमिका घेतल्याने किरकोळ वादही निर्माण झाला. आंदोलनाचे नेतृत्व करणारे मये भू-विमोचन नागरिक कृती समितीचे सखाराम पेडणेकर यांच्यासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत सुमारे तीन तास रोखून धरलेले खनिजवाहू ट्रक सोडले. स्थानिकांचे ट्रक रस्त्यावर उतरवून मयेवासीयांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

सखाराम पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली मोजक्याच लोकांनी मंगळवारी सकाळी गावकरवाडा येथे खनिजवाहू ट्रक रोखले. गेल्या बुधवारी (ता.16) मयेवासीयांनी खनिज वाहतूक (transport) रोखली असता, सरपंचांसह आठजणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर खनिज वाहतुकीविरोधात वातावरण अधिकच तापले आहे. मयेवासीयांचा (mayem) वाढता विरोध असलेल्या खनिज वाहतुकीविषयी तोडगा काढण्यासाठी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या निर्देशानुसार डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी काल (सोमवारी) बोलावलेली बैठकही निष्फळ ठरली होती.

mayem movement takes a different turn; Both arrested
राज्यपालांनी निर्यात व्यवसायाबाबत केलं मोठ आवाहन

मंगळवारी सकाळी खनिज (Mining) वाहतूक सुरू होताच सखाराम पेडणेकर यांच्यासह काही नागरिकांनी ट्रक अडवले. आजच्या आंदोलनात मात्र नागरिकांचा सहभाग कमी होता. दुपारी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी अजित वायंगणकर यांनी आंदोलनस्थळी येऊन त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांना समजावण्याचा प्रयत्नही केला.

मारहाण केल्याची ट्रकवाल्याची तक्रार

आंदोलनाची (movement) माहिती मिळताच डिचोलीच्या महिला पोलिस उपनिरीक्षक करिश्मा परूळेकर पोलिसांसह आंदोलनस्थळी दाखल झाल्या. साधारण पावणेबाराच्या दरम्यान डिचोलीचे पोलिस निरीक्षक महेश गडेकर पोलिस फौजफाट्यासह आंदोलनस्थळी आले. ते त्याठिकाणी येताच सखाराम पेडणेकर यांनी आपला ट्रक अडवून आपल्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची तोंडी तक्रार एका ट्रकवाल्याने पोलिसांकडे (police) केली. उलट ट्रक आपल्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. अशी तक्रार श्री. पेडणेकर यांनी केली.

दोघांना अटक

ट्रकवाले आणि आंदोलनकर्ते यांच्यात काहीशी वादावादी सुरू झाली. ट्रकचालकाच्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी सखाराम पेडणेकर यांच्यासह अजित सावंत यांना ताब्यात घेऊन डिचोली पोलिस स्थानकात आणून अटक केली. तोंडी तक्रार करणाऱ्या ट्रकचालकांनी मात्र नंतर पोलिसात लेखी तक्रार दिलीच नसल्याची माहिती मिळाली. सखाराम पेडणेकर आणि अजित सावंत यांना आज (मंगळवारी) मिळून आठ दिवसांच्या आत दुसऱ्यांदा अटक केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com