Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

'मोपा विमानतळावरील नोकऱ्यांसाठी अर्ज करा'

आमदार प्रवीण आर्लेकर यांचं गोमंतकीय तरुणांना आवाहन

दैनिक गोमन्तक

पेडणे : मागचे सगळे विसरून आता नव्या उमेदीने आम्ही काम करूया, त्यासाठी प्रत्येक घरात रोजगार मिळवण्यासाठी मोपा विमानतळावरून जे जे रोजगार निर्मिती होणार आहे. त्यासाठी युवकांनी मोपा विमानतळाच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन पेडणेचे आमदार तथा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांनी केले आहे.

मागच्या लोकप्रतिनिधींनी जो विकास केला नाही तो विकास आपल्याला या भागात करायचा आहे. मागचे रडगाणे आता पुन्हा करुन फायदा नाही, त्यासाठी सर्वांनी संघटित होऊन विकास करुया, असेही आवाहन प्रवीण आर्लेकर यांनी केले आहे. आमदार प्रवीण आर्लेकर (Pravin Arlekar) यांच्या आवाहनामुळे पेडण्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mopa Airport) ज्या ज्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत आणि कंपनीने अर्ज मागवले आहेत तिथं प्रत्येकाने अर्ज करावेत, असे आवाहन प्रवीण आर्लेकर यांनी केलं आहे.

दरम्यान पेडणे (Pernem) मतदार संघातील प्रत्येक घराघरात सरकारी किंवा निमसरकारी चांगल्या पगाराची नोकरी आवश्यक आहे. मागच्या लोकप्रतिनिधींनी किंवा सरकारने (Government) एकाच घरात जे सरकारी नोकर आहेत, त्यांच्याच घरी अनेकांना नोकऱ्या दिल्या आहेत. परंतु प्रवीण आर्लेकर यांनी आता प्रत्येक घराचा सर्वे करुन ज्या घरात सरकारी नोकरी नाही. त्या घरात अगोदर प्राधान्यक्रमाने सरकारी नोकरी किंवा चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन स्थानिक नेते रमेश सावळ यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job: आमच्यावर पोलिसांमार्फत पाळत! सरदेसाई, पालेकरांचा सनसनाटी आरोप

Rashi Bhavishya 25 November 2024: उद्योजकांसाठी आजचा दिवस खास, मिळणार मोठी डील... तुमच्या राशीत दडलंय काय?

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

SCROLL FOR NEXT