व्याघ्र क्षेत्र प्रस्तावाला मान्यता देणार नाही; विश्वजित राणे

म्हादई अभयारण्याला ‘व्याघ्र प्रकल्प’ जाहीर केल्यास संपूर्ण राज्यावर त्याचे परिणाम होतील; विश्वजित राणे
Goa Minister Vishwajit Rane rules out declaring Mahadayi sanctuary, surrounding areas as tiger reserve
Goa Minister Vishwajit Rane rules out declaring Mahadayi sanctuary, surrounding areas as tiger reserveDainik Gomantak

गोव्याचे वनमंत्री विश्वजित राणे यांनी महादयी वन्यजीव अभयारण्य आणि त्याच्या सभोवतालचा संरक्षित परिसर व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याची शक्यता फेटाळून लावली. राज्याच्या ईशान्य भागात असलेल्या महादयी वन्यजीव अभयारण्याभोवतीचा संपूर्ण परिसर व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याच्या पर्यावरणवाद्यांनी केलेल्या मागणीला विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी नुकतेच फेटाळून लावले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, म्हादई अभयारण्याला ‘व्याघ्र प्रकल्प’ जाहीर केल्यास संपूर्ण राज्यावर त्याचे परिणाम होतील. जोपर्यंत मी या खात्याचा मंत्री आहे, तोपर्यंत व्याघ्र क्षेत्र प्रस्तावाला मान्यता देणार नाही.

Goa Minister Vishwajit Rane rules out declaring Mahadayi sanctuary, surrounding areas as tiger reserve
दूधसागर नदीत बुडून तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

राज्याच्या वनविभागाकडून (Forest Department) मिळालेल्या माहितीचा हवाला देत राणे म्हणाले, वनविभाग राज्यातील वन्यप्राण्यांकडे अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी अंतराळ पर्यटनाअंतर्गत (Tourism) विविध उपक्रम राबवत आहे. राज्यात पाच वन्यजीव अभयारण्ये आणि एक राष्ट्रीय उद्यान आहे.

वाघ सुरक्षित राहिला तरच...

दरम्यान, गोव्याच्‍या शहरी आणि ग्रामीण भागातल्या बहुतांश लोकसंख्येला पेयजलाचा पुरवठा करणाऱ्या जंगलात अन्नसाखळीत शिखरस्थानी असलेला पट्टेरी वाघ सुरक्षित राहिला तरच हवामान बदल, जागतिक तापमान वाढीमुळे निर्माण होणाऱ्या वर्तमान आणि भविष्यकालीन प्रतिकूल परिस्थितीत संरक्षण होणार आहे. त्‍यामुळे या वनक्षेत्राचे संवर्धन करण्‍याबरोबरच आपल्‍या संरक्षणासाठी गोमंतकीयांनी दक्ष रहाणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com