Flights To Goa Dainik Gomantak
गोवा

Flights To Goa: कोकण रेल्वे ठप्प, महामार्गावर ब्लॉक! मुंबई, पुण्यातून विमानाने गोव्याला जायचा खर्च किती येईल?

Airfare for Goa Flights: अनेक प्रवासी सध्या रेल्वे किंवा रोडने प्रवास करण्यापेक्षा विमानप्रवासाला पसंती देत आहेत.

Pramod Yadav

गोव्यात सध्या मुसधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला असून, रेल्वे वाहतूक ठप्प झालीय. तसेच, मुंबई गोवा महामार्गावर देखील ११ ते १३ जुलै या काळात सकाळी आणि दुपारी असा रोज चार तास ब्लॉक घेतला जाणार आहे.

रेल्वे वाहतूक विस्कळीत असून महामार्गावर देखील विलंब होणार असल्याने अनेकजण गोव्याला जाण्यासाठी विमानाचा पर्याय तपासून पाहत आहेत. पण मुंबई, पुण्यातून विमानाने गोव्याला जायचा खर्च किती येईल? चला पाहूया सविस्तर.

कोकण रेल्वेचे वेळापत्रक मंगळवार रात्रीपासून कोलमडले आहे. गोव्यातील मालपे पेडणे येथील बोगद्यातील रुळांवर चिखलमिश्रित पाणी आल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दोनशे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी कार्यरत असून, आज रात्री आठपर्यंत हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे.

तर, मुंबई गोवा महामार्गावर तीन दिवस चार तासांसाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे विमानप्रवासाला अनेक प्रवासी पसंती देत आहेत.

मुंबई ते गोवा विमान प्रवासाला खर्च किती येईल

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरुन गोव्यातील दाबोळी विमानतळासाठी 4,928, 6,000 ते दहा हजारांपर्यंत पैसे मोजावे लागतील. आणि जर, तुम्ही उत्तरेतील मोपा विमानतळावर उतरणार असाल तर साडे चार हजार रुपयांपासून ते 6,733 ते दहा हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागतील.

Mumbai To Goa Airfare

पुणे ते गोवा विमानप्रवास खर्च

तसेच, पुण्यातून गोव्यात जाण्यासाठी दाबोळी विमानतळासाठी 3,343, 5,479 ते 8,247 रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागतील. तर, उत्तर गोव्यातील मोपा विमानतळासाठी विस्तारा, एअर इंडिया किंवा इंडिगो या विमानांचे तिकीट अधिक (दहा हजार पेक्षा अधिक) आहे.

Pune To Goa Airfare

रविवारी तिकीट कमी

येत्या रविवारी जर तुम्ही मुंबईतून गोव्याला जाणार असाल तर तुम्हाला दोन हजार रुपयांपेक्षा कमी पैसे मोजावे लागतील. कारण सतराशे ते आठराशे रुपयांत तुम्ही गोव्याला जाऊ शकता.

कृपया नोंद घ्यावी वर नमूद करण्यात आलेले तिकीट दर ऑनलाईन फ्लाईट बुकींकसाठी वापरल्या जाणाऱ्या गोआयबिबो आणि इक्सिगो या संकेतस्थळावरील तिकीट दरानुसार दिलेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT