Konkan Railway: कधी होणार कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत? अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

Konkan Railway Update: मध्यरात्री पुन्हा रुळांवर चिखल साचल्याने काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला.
कधी होणार कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत? अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती
Pernem Tunnel GoaDainik Gomantak

गोव्यातील पेडणे बोगद्यात चिखलमिश्रित पाणी साचल्याने कोकण रेल्वेची वाहतूक मंगळवार रात्रीपासून विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वेचे कर्मचारी मार्ग मोकळा करण्यासाठी कार्यरत असून, मार्ग कधी मोकळा होणार.

याकडे अनेक प्रवासी लक्ष ठेवून आहेत. कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्वाची अपडेट समोर आली असून, मार्ग केव्हापर्यंत सुरु होईल याबाबत माहिती देण्यात आली आहे.

राज्यात गेल्या तीन दिवासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्यासह पडझडीच्या घटना घडल्या. उत्तर गोव्यातील डिचोली, थिवी या भागात पूर सदृष्य स्थिती निर्माण झाली.

मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेच्या मार्गाला देखील बसला. मुसळधार पावसामुळे पेडण्यातील बोगद्यात मोठ्या प्रमाणावर चिखलमिश्रित पाणी आल्याने रेल्वे वाहतूक सावंतवाडी आणि कणकवलीत रोखण्यात आली.

प्रयत्नानंतर अखेर मार्ग खुला करण्यात आला पण पुन्हा रुळांवर चिखल साचल्याने काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला.

कधी होणार कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत? अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती
Konkan Railway News: आणखी काही ट्रेन्स रद्द, काहींच्या मार्गात बदल; पेडणे बोगद्यातील कामाची ताजी अपडेट

दरम्यान, आता कोकण रेल्वेच्या वतीने मार्गावरील वाहतूक केव्हा सुरु होईल याची माहिती दिली आहे. रेल्वे विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार रात्री आठ वाजेपर्यंत मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

बोगद्यात शंभर ते दीडशे कर्मचारी कार्यरत असून वीस ते तीस उच्च अधिकारी कार्यरत असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली आहे. संतोष कुमार झा देखील याच ठिकाणी असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com