GCA Election Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

GCA Election: गोव्यातील क्रिकेटमध्ये ‘परिवर्तन’ की प्रस्थापित? देसाई-फडके एकत्र आल्याने उत्सुकता; रोहन देसाई गटाचे आव्हान

Goa Cricket Election: गोव्यातील क्रिकेटमध्ये मागील सुमारे तीन दशकांपासून सक्रिय असलेले गोवा क्रिकेट असोसिएशनमध्ये (जीसीए) माजी अध्यक्ष चेतन देसाई व विनोद (बाळू) फडके यांना प्रस्थापित मानले जाते.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यातील क्रिकेटमध्ये मागील सुमारे तीन दशकांपासून सक्रिय असलेले गोवा क्रिकेट असोसिएशनमध्ये (जीसीए) माजी अध्यक्ष चेतन देसाई व विनोद (बाळू) फडके यांना प्रस्थापित मानले जाते. यावेळच्या निवडणुकीत ते स्वतः नसले, तरी त्यांचा गट आहे. त्यांना तीन वर्षांपूर्वी जीसीएत पदार्पण केलेल्या रोहन गावस देसाई यांचा पाठिंबा असलेला ‘परिवर्तन’ गट आव्हान देत आहे. या पार्श्वभूमीवर उत्कंठा वाढली असून मतदार असलेल्या संलग्न १०७ क्लबांचा कौल गोमंतकीय क्रिकेटमध्ये निर्णायक ठरणार आहे.

जीसीए व्यवस्थापकीय समिती निवडणूक येत्या १६ सप्टेंबर रोजी होईल. जीसीए निवडणूक अधिकारी ए. के. जोती यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मुदत संपल्यानंतर निवडणूक उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव व खजिनदार ही पाच पदे आणि एका सदस्यासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात एकूण १३ उमेदवार नशीब आजमावत आहेत.

यामध्ये सचिवपदासाठीचे तटस्थ उमेदवारी माजी रणजी संघ उपकर्णधार हेमंत पै आंगले यांचा अपवाद वगळता इतर पाच जागांसाठी चेतन देसाई-विनोद फडके गट विरुद्ध रोहन गावस देसाई यांचा ‘परिवर्तन’ गट यांच्यात थेट लढत होत आहे. रोहन सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे संयुक्त सचिव आहेत.

जीसीएतील सहा जागांसाठी छाननीनंतर १० सप्टेंबर रोजी ४१ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी २८ अर्ज मागे घेण्यात आल्याने आता १३ उमेदवारांत चुरस आहे. माजी अध्यक्ष सूरज लोटलीकर व माजी खजिनदार अकबर मुल्ला यांचाही चेतन-बाळू गटाला पाठिंबा लाभला आहे.

क्रिकेट विरुद्ध बुद्धिबळ

जीसीए अध्यक्षपदासाठी उमेदवार असलेले महेश देसाई हे माजी अध्यक्ष चेतन देसाई यांचे कनिष्ठ बंधू असून गोव्याचे माजी रणजीपटू आहे. गोव्याच्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या मोसमात १९८५-९८ मध्ये त्यांनी पदार्पण केले होते. त्यांचे अध्यक्षपदाचे प्रतिस्पर्धी महेश कांदोळकर हे सध्या गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष असून क्लब पातळीवर प्रशासक या नात्याने सक्रिय आहेत.

मावळत्या समितीतील तिघे पदाधिकारी

निवडणुकीत मावळत्या व्यवस्थापकीय समितीतील तिघे पदाधिकारी आहेत. यामध्ये खजिनदार दया पागी, संयुक्त सचिव रुपेश नाईक व सदस्य राजेश पाटणेकर हे परिवर्तन गटाचे प्रतिनिधित्व करत आहेत. अध्यक्ष विपुल फडके व सचिव शंभा नाईक देसाई यांनी सलग दोन कालावधीत पद भूषविल्यामुळे नियमानुसार ते आता ‘कुलिंग’ प्रक्रियेत असल्याने निवडणूक रिंगणात नाहीत. चेतन-बाळू गटातर्फे सचिवपदाचे उमेदवार तुळशीदास शेट्ये मावळत्या समितीत स्वीकृत सदस्य आहेत.

तीन वर्षांपूर्वी एकत्रित १०७ मते!

तीन वर्षांपूर्वी महेश देसाई यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फक्त तीन मतांनी हार पत्करावी लागली होती. तेव्हा विनोद फडके यांचे पूत्र विपुल फडके ५५ मते मिळवून अध्यक्ष बनले होते, तर महेश यांना ५२ मते मिळाली होती. दोघांच्या एकत्रित एकत्रित मतांची बेरीज १०७ होते. आताही निवडणुकीत १०७ मतदार क्लब आहे. त्यामुळे यावेळेस चेतन व फडके एकत्रित आल्यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रॅफिक पोलीसही चक्रावले! बाईकसारखी दिसणारी सायकल चालवणाऱ्या 'जुगाडू' तरुणाचा व्हिडिओ व्हायरल; यूजर म्हणाले, भारतात...

Asia Cup 2025: पाकिस्तानविरूध्दच्या सामन्याआधीच टीम इंडियाला तगडा झटका, 'या' स्टार खेळाडूनं सोडली साथ, कारण काय?

नेपाळी नागरिकाचा गोव्यात संतापजनक प्रकार; दोन पाळीव कुत्र्यांना विष देऊन केले ठार

Delhi High Court Bomb Threat: तीन बॉम्ब ठेवलेत, थोड्याच वेळात फुटतील... दिल्ली उच्च न्यायालयाला धमकीचा मेल, पोलिस अलर्ट मोडवर

Rangoli: एक लाख रुपयांची 'रांगोळी', गोव्यात उंबरठ्यापलीकडे गेलेली कला

SCROLL FOR NEXT