GCA: 'जीसीए' निवडणुकीत 6 जागांसाठी 46 अर्ज! माजी सभापती पाटणेकरही रिंगणात; देसाईंना आव्हान

GCA Election: १० सप्टेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. ११ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. तेव्हा निवडणुकीचे एकंदरीत चित्र स्पष्ट होईल.
GCA Election
GCA ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) आगामी व्यवस्थापकीय समिती निवडणुकीत एकूण सहा जागांसाठी ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, त्यात माजी सभापती राजेश पाटणेकर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अर्ज केल्यामुळे निवडणुकीचे महत्त्व वाढले आहे. अर्ज सादर करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता.

१० सप्टेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. ११ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. तेव्हा निवडणुकीचे एकंदरीत चित्र स्पष्ट होईल. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव, खजिनदार हे पाच पदाधिकारी, तसेच एका सदस्यपदासाठी १६ सप्टेंबर रोजी निवडणूक नियोजित आहे.

माजी सभापती राजेश पाटणेकर जीसीएत डिचोली क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करतात. मावळत्या समितीत ते सदस्य आहेत. आता ते अध्यक्ष अथवा उपाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.

सूत्रानुसार, ते अध्यक्षपदासाठी दावा करू शकतात, तसेच झाल्यास अध्यक्षपदासाठी आणखी एक इच्छुक महेश कांदोळकर सचिवपदाच्या शर्यतीत असतील. जलसंपदा खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांचे बंधू मेघनाथ शिरोडकर उमेदवारी रिंगणात उतरले आहेत.

गोव्याचे माजी रणजीपटू महेश देसाई अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यांनी या पदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गोव्याचे माजी रणजीपटू आदित्य आंगले यांनी उपाध्यक्ष व सदस्यपदासाठी अर्ज भरला आहे.

सध्या ते जीसीए समितीत क्रिकेट प्रतिनिधी सदस्य या नात्याने सक्रिय आहेत. माजी रणजी उपकर्णधार हेमंत आंगले यांनी सचिवपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत.

मावळत्या समितीतील सलग दोन टर्म पूर्ण केलेले अध्यक्ष विपुल फडके आणि उपाध्यक्ष, पण आता सचिवपद सांभाळणारे शंभा नाईक देसाई नियमानुसार यावेळी ‘कुलिंग’ कालावधीत आहेत, त्यामुळे हे दोन्ही प्रमुख पदाधिकारी यावेळच्या निवडणूक रिंगणात नाहीत. मावळत्या समितीतील संयुक्त सचिव रुपेश नाईक, खजिनदार दया पागी यांनीही आणखी एका टर्मसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील वेळेस उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभूत झालेले अनंत नाईक यांनीही उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

GCA Election
GCA: गोवा क्रिकेट संघटनेत पुन्हा 2 गट, निवडणूक होणार 16 सप्टेंबर रोजी; समितीतील मतभेद गाजण्याचे संकेत

कांदोळकरांचे बुद्धिबळ अध्यक्षपद संकटात

क्रीडा संघटना नियमानुसार, एक व्यक्ती एकावेळी दोन वेगवेगळ्या क्रीडा संघटनांत पदे भूषवू शकत नाहीत. त्यानुसार, महेश कांदोळकर गोवा क्रिकेट असोसिएशन निवडणुकीत पदाधिकारी पदी निवडून आल्यास त्यांना गोवा बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे भाग पडेल. तसे झाल्यास गोवा बुद्धिबळ संघटनेला नवा अध्यक्ष लाभू शकतो. राज्य बुद्धिबळ संघटनेही दोन गटांत तीव्र संघर्ष असल्याने या संघटनेचे अध्यक्षपदही चर्चेचा विषय ठरण्याचे संकेत आहेत.

GCA Election
GCA: 'जीसीए' निवडणुकीसाठी संलग्न 4 क्लब टांगणीवर! 107 क्लबची यादी अंतिम; उमेदवारी अर्ज स्वीकारायला सुरुवात

जीसीए निवडणुकीसाठी सादर उमेदवारी अर्ज

अध्यक्ष (८ अर्ज) ः अनंत नाईक, महेश देसाई (२ अर्ज), महेश कांदोळकर, परेश फडते, राजेश पाटणेकर, सय्यद अब्दुल माजिद, सुदेश राऊत.

उपाध्यक्ष (६ अर्ज) ः आदित्य आंगले, अमरेश नाईक, परेश फडते, राजेश पाटणेकर, सय्यद अब्दुल माजिद, तुळशीदास शेट्ये.

सचिव (८ अर्ज) ः आदित्य चोडणकर, अमरेश नाईक, दया पागी (२ अर्ज), हेमंत पै आंगले, महेश कांदोळकर, सय्यद अब्दुल माजिद, तुळशीदास शेट्ये.

संयुक्त सचिव (९ अर्ज) ः आदित्य चोडणकर, अनंत नाईक (२ अर्ज), जमीर करोल, मेघनाथ शिरोडकर, परेश फडते, रुपेश नाईक, सैबर मुल्ला, सुशांत नाईक.

खजिनदार (८ अर्ज) ः दया पागी, जमीर करोल, मेघनाथ शिरोडकर, परेश फडते, रुपेश नाईक, सैबर मुल्ला, सय्यद अब्दुल माजिद, उमेश गावस.

सदस्य (७ अर्ज) ः आदित्य चोडणकर,

आदित्य आंगले, महेश बेहकी, मेघनाथ

शिरोडकर, रुपेश नाईक, उमेश गावस, विकास पार्सेकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com