मात्र हे करण्याची वैचारिक प्रगल्भता निर्णयकर्ते, राजकीय नेते आणि राज्यकर्त्यांनी दाखवायला हवी.इथून पुढे काय? अभिजितच्याच शब्दांत सांगायचे झाले तर तो म्हणतो, ‘आम्हाला एक स्वतंत्र, तरुणांच्या नेतृत्वाखालील चळवळ उभी करायची आहे, जी तरुणांच्या चिंतांवर आणि सरकारला जाब विचारण्यावर लक्ष केंद्रित करेल. आमची मूल्ये भारताच्या संविधानाशी सुसंगत आहेत. आमचा धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि सामाजिक न्यायावर विश्वास आहे. पक्षपाती राजकारणात न पडता आम्ही आमचे प्रश्न विधायक पद्धतीने मांडू.’
कादंबरीचा नायक सामसा हा परिस्थितीच्या ओझ्याखाली झुकलेला एक साधासुधा सेल्समन असतो - जबाबदारी, आर्थिक ओढाताण आणि रोजचे धकाधकीचे जीवन यांमुळे पिचलेला एक सामान्य मध्यमवर्गीय तरुण. एक दिवस सकाळी उठल्या उठल्या त्याला जाणवते की, तो भावनिकदृष्ट्या जरी माणूस असला, तरी त्याचे बाह्य स्वरूप एका कीटकात बदलले आहे. तिथून सुरू होते त्याची स्वतःमधील आणि आपल्या भोवतालच्या माणसांमधील माणूसपण टिकवून ठेवण्याची केविलवाणी धडपड.
ज्या कुटुंबावर त्याची सारी भिस्त असते, तेच त्याची किळस करू लागतात. त्याला एका खोलीत बंद करून टाकतात. एक दिवस रागाने त्याचा बाप आपल्या हातातील ॲपल (सफरचंद) त्याच्यावर फेकून मारतो; जे त्याच्या पाठीवरील कठीण कवचाला भेदून त्याच्या मांसात जाऊन रुतून बसते. तो आजपर्यंत ज्या व्यवस्थेचा स्वतःला अविभाज्य घटक समजायचा, ती व्यवस्थाच त्याला झिडकारते. हे झिडकारणे त्या ॲपलच्या रूपाने त्याच्या शरीरात रुतून कुजत जाते आणि त्याच्या शरीरालाही कुजवत जाते; त्याच्यातील माणुसकीवरील विश्वासाला संपवत जाते.
आणि एक दिवस, ज्या बहिणीचे आपल्यावर जीवापाड प्रेम आहे, असे तो समजत होता, तीच बहीण त्याला घरातून हाकलून लावण्याचा प्रस्ताव कुटुंबासमोर मांडताना तो ऐकतो. तेव्हा त्याचा सर्वच व्यवस्थांवरील विश्वास उडतो. अंतर्बाह्य खचलेला तो आपल्या खोलीमध्ये परतून मरून जातो! अभिजित दिपकेने जेव्हा १६ मे रोजी ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (सीजेपी) रूपाने एल्गार छेडला, तेव्हापासून ही सामसाची कथा माझ्या डोक्यात थैमान घालत आहे. प्रस्थापित व्यवस्थेच्या दुर्लक्ष करण्याचे, झिडकारण्याचे (जसे सीजेआय सूर्यकांत यांनी झिडकारले तसे) प्रतीक असलेला हा कुजका ॲपल!
तो स्वतःमध्ये रुतल्यामुळे स्वतःला संपताना पाहून हतबल होऊन आपली तरुणाई चुकीच्या मार्गाकडे वाटचाल करत आहे. तरुणाईच्या या अश्वत्थामी जखमांकडे व्यवस्थेचे लक्ष ओढून, त्यावर उपाय करण्याची निकड ‘सीजेपी’ने अधोरेखित केली. व्यवस्थेबद्दलची साचलेली चीड बाहेर काढून भावना मोकळ्या करण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ दिले. किंबहुना, त्यांच्या अमूर्त भीती आणि चिंतांना ठोस शब्दांत बेझिझक मांडायची सोय करून मानसिक नैराश्याच्या वाटेवर जाण्यापासून रोखणारा एक भावनिक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ त्यांना बहाल केला.
एखाद्या मानसशास्त्रज्ञाशी बोलाल, तर अशा प्रकारच्या प्रेशर कुकरमध्ये असते तसल्या ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’चे माणसाच्या भावनिक आयुष्यातील महत्त्व तुमच्या लक्षात येईल. आजवर ज्या खदखदीची कोणी साधी दखलही घेतली नव्हती, तिथे प्रत्येक व्यासपीठावर, मग ते राजकीय असो की सामाजिक - गेले अनेक दिवस याच विषयाची साधक-बाधक चर्चा होत आहे. गोव्यातील दैनिक ‘गोमन्तक’पासून ते युकेतील ‘बीबीसी’पर्यंत जगभरच्या सर्वच प्रसारमाध्यमांवर आणि व्यासपीठांवर याबद्दल बोलले जात आहे. ‘सीजेपी’चे समाजासाठीचे हे खूप मोठे योगदान नाही तर दुसरे काय आहे?
कीटकात परिवर्तन झाले म्हणून सामसासारखे आयुष्याशी हार न मानता, ‘हो, आहोत आम्ही कीटक! पण आमच्या या अवस्थेला जबाबदार आहे ही आमच्या भल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणारी आत्ममग्न व्यवस्था,’ हे स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य या आंदोलनाने तरुणांना दिले आहे. प्रस्थापित सिस्टीमने निर्माण केलेले वातावरण फक्त झुरळेच तयार होण्यासाठी पूरक आहे. आमची झुरळे झालेली नको असतील तर व्यवस्था बदला. चांगला मानव घडवण्यासाठी पूरक वातावरण बनवण्याच्या दृष्टीने पुनर्नियोजन करा, अशी मागणी ही तरुणाई करतेय.
अवघ्या काही दिवसांत या झुरळांच्या वावटळीने देशाच्या कानाकोपऱ्याला व्यापून टाकले आहे. करोडो लोक इंस्टाग्राम, एक्स, सीजेपी वेबसाईट, ‘स्नॅपचॅट’, ‘रेडिट’ इत्यादी ‘प्लॅटफॉर्म्स’वर या अभियानाशी जोडले जात आहेत. होणाऱ्या प्रखर परिणामांची संपूर्ण कल्पना असूनही, जीवावर उदार होऊन व्यवस्थेच्या चुका दाखवण्याचे धारिष्ट्य अभिजीतने दाखवले हे जाणून, ‘सीजेपी’च्या व्यासपीठांवर जाऊन, कोणाच्याही धाकाची तमा न बाळगता तरुण व्यक्त होत आहेत.
संघटित होऊन देशासमोरील समस्यांवर मात कशी करायची, याविषयी विचारविनिमय करत आहेत. जागतिक अशांतता, एआयच्या झंझावातामुळे रोजगाराच्या संधींवर होणारा भयंकर परिणाम, त्यामुळे आलेली प्रचंड हतबलता, डळमळत जाणारी शिक्षण व्यवस्था, पेपर लीक, भ्रष्टाचार, राजकीय हेतू समोर ठेवून माणसा माणसांमध्ये फूट पाडण्यासाठी केले गेलेले जाणीवपूर्वक प्रयत्न, तरुणाईसंबंधीची एकूण राजकीय अनास्था, व्यवस्थेतील उत्तरदायित्वाचा अभाव अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर देशाचा तरुण किती गंभीरपणे विचार करतोय, याची झलक त्यांनी तयार केलेला ‘रिल्स’ ते ‘मिम्स’ पर्यंतचा ‘कंटेंट’ देतोय.
खेदाची बाब म्हणजे, व्यवस्थेसमोर आरसा धरून तिचे खरे रूप दाखवण्याच्या या प्रयत्नाकडे आत्मपरीक्षणाची संधी म्हणून पाहण्याऐवजी, तो स्वतःविरुद्ध रचलेला कट असल्याप्रमाणे पाहिले जात आहे. ‘सीजेपी’चे ‘एक्स’ हँडल बंद पाडण्याचे प्रयत्न, वेबसाईट हॅक करणे, धमक्या देणे आणि ट्रोलिंगचा मारा करणे, ही त्या अस्वस्थतेचीच लक्षणे आहेत. आपल्या घरातील एखादा तरुण किंवा तरुणी स्वतःच्या न्याय्य हक्कासाठी आपल्याशी भांडते, तेव्हा आपण त्यांना कारस्थानी म्हणतो की त्यांची बाजू समजून घेतो? सीजेपीच्या बाबतीतही तेच व्हायला पाहिजे की नको?
गेली अनेक वर्षे गोव्याच्या आयटी क्षेत्रातील हजारो कोक्रोचांची होणारी तगमग मी अगदी जवळून अनुभवत आहे. म्हणूनच एक जबाबदार नागरिक आणि एक पालक म्हणूनही मला वाटते की, या युवकांना खलनायक ठरवून, त्यांच्या उद्रेकाला बंड समजून मोडून काढण्याचा प्रयत्न करणे हा या साऱ्यावर उपाय असूच शकत नाही. त्यांची पद्धत चुकीची असूही शकते, पण त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न मात्र खरे आणि गंभीर आहेत, हे आपण सारेच जण जाणतो.
देशाला उज्ज्वल भविष्य देणे हे सीजेपीचे लक्ष्य आहे, हे त्यांनी वारंवार अधोरेखित केले आहे. सत्तेतील निर्णयकर्त्यांचेही लक्ष्य हेच आहे, हे आपण गृहीत धरूया. तर मग या समान लक्ष्याच्या वाटेवर द्रुतगतीने पुढे जाण्यासाठी, या ‘कोक्रोचां’शी समोरासमोर, सर्व छुपे अजेंडे बाजूला ठेवून चर्चा विनिमय व्हायला हवा. त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा ऊहापोह व्हायला हवा.
आजच्या व्यवस्थेमध्ये समस्या आहेत, त्रुटी आहेत, अक्षम्य चुका आहेत आणि त्यांच्यावर लवकरात लवकर उपाय काढण्याची गरज आहे, हे कोणीही नाकबूल करू शकणार नाही. मग काढूया की हे उपाय, या तरुणाईच्या साहाय्याने! या पिढीकडे कल्पनांची झेप आहे, तंत्रज्ञानाची ताकद आहे आणि मनात बदलाची तळमळ आहे. त्यांना व्यवस्थेच्या दारात थांबवू नका; त्यांना समजून घ्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करा. मग ते व्यवस्थेचे टीकाकार नव्हे, तर तिचे शिल्पकार बनतील.
मात्र हे करण्याची वैचारिक प्रगल्भता निर्णयकर्ते, राजकीय नेते आणि राज्यकर्त्यांनी दाखवायला हवी. इथून पुढे काय? अभिजितच्याच शब्दांत सांगायचे झाले तर तो म्हणतो, ‘आम्हाला एक स्वतंत्र, तरुणांच्या नेतृत्वाखालील चळवळ उभी करायची आहे, जी तरुणांच्या चिंतांवर आणि सरकारला जाब विचारण्यावर लक्ष केंद्रित करेल. आमची मूल्ये भारताच्या संविधानाशी सुसंगत आहेत. आमचा धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि सामाजिक न्यायावर विश्वास आहे. पक्षपाती राजकारणात न पडता आम्ही आमचे प्रश्न विधायक पद्धतीने मांडू.’
पुढील टप्प्यात सीजेपी देशभरातील समर्थकांकडून चळवळ पुढे नेण्यासाठी सूचना व कल्पना मागवत आहे. योग्य कल्पनांचे केंद्रित मोहिमांमध्ये रूपांतर करत, सकारात्मक बदलासाठी प्रभावी आणि संघटित ‘प्रेशर ग्रुप’ उभा करण्याचा सीजेपीचा मानस आहे. गांधीजी १९४५ साली नेहरूंना लिहिलेल्या एका पत्रात म्हणतात ‘सकारात्मक असंतोष ही प्रगतीची नांदी असते’. आज ‘सीजेपी’च्या धारदार प्रश्नांमागे आणि संघर्षात तोच धगधगता असंतोष जाणवतो आहे. हा असंतोष उद्याचा अधिक न्याय्य, सजग आणि सर्व दृष्टीने प्रगत भारत घडवो- हीच सदिच्छा!
पुढील टप्प्यात सीजेपी देशभरातील समर्थकांकडून चळवळ पुढे नेण्यासाठी सूचना व कल्पना मागवत आहे. योग्य कल्पनांचे केंद्रित मोहिमांमध्ये रूपांतर करत, सकारात्मक बदलासाठी प्रभावी आणि संघटित ‘प्रेशर ग्रुप’ उभा करण्याचा सीजेपीचा मानस आहे.गांधीजी १९४५ साली नेहरूंना लिहिलेल्या एका पत्रात म्हणतात ‘सकारात्मक असंतोष ही प्रगतीची नांदी असते’. आज ‘सीजेपी’च्या धारदार प्रश्नांमागे आणि संघर्षात तोच धगधगता असंतोष जाणवतो आहे.
हा असंतोष उद्याचा अधिक न्याय्य, सजग आणि सर्व दृष्टीने प्रगत भारत घडवो- हीच सदिच्छा!संगीता नाईकएक दिवस सकाळी जेव्हा ग्रेगोर सामसा एका भयावह स्वप्नातून एकदम दचकून उठतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते की, आपले रूपांतर एका किळसवाण्या कीटकात झाले आहे!या शब्दांनी सुरू होणारी फ्रान्झ काफ्का या विसाव्या शतांतील प्रतिभावान, जर्मन भाषिक लेखकाची ‘मेटामॉर्फोसिस’ नावाची एक अस्वस्थ करणारी लघुकादंबरी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.