Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Usha Nadkarni Personal Life: 'पवित्र रिश्ता' मालिकेतील कडक स्वभावाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक भावनिक खुलासे केले.
Usha Nadkarni Personal Life
Usha Nadkarni Personal LifeDainik Gomantak
Published on
Updated on

'पवित्र रिश्ता' मालिकेतील कडक स्वभावाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक भावनिक खुलासे केले. हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीत जवळपास सात दशकांपासून सक्रिय असलेल्या उषा नाडकर्णी आज 80 व्या वर्षी मुंबईत एकट्याच राहतात. अभिनय क्षेत्रात मोठे यश मिळवूनही वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

बालपणापासूनच संघर्षांची मालिका

उषा नाडकर्णी यांनी सांगितले की, त्यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. वडिलांचा स्वभाव अत्यंत कठोर आणि रागीट होता. घरातील किरकोळ कारणांवरूनही त्यांना आणि त्यांच्या भावंडांना मारहाण केली जात असे. अभिनयाची आवड असतानाही वडिलांच्या भीतीमुळे त्या कधीच आपले स्वप्न सांगू शकल्या नाहीत.

जेव्हा त्यांनी आईसमोर अभिनेत्री होण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा आईनेही त्यास विरोध केला. समाज काय म्हणेल, या भीतीमुळे त्यांना घराबाहेर काढल्याचा धक्कादायक अनुभवही त्यांनी सांगितला.

Usha Nadkarni Personal Life
Goa Politics: 'आरजी'कडून निलंबित खोलकरांना चौकशीसाठी नोटीस; 7 ऑगस्‍टला हजर राहण्‍याचे निर्देश

संसार टिकला नाही, मुलासोबतही दुरावा

उषा नाडकर्णी यांनी प्रथमच आपल्या वैवाहिक आयुष्याबाबतही भाष्य केले. त्या अनेक वर्षांपासून पतीपासून वेगळ्या राहत असून, त्यांच्यात कोणताही वैवाहिक संबंध उरलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पतीच्या कुटुंबाविषयी त्यांच्या मनात कोणताही राग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांचा मुलगा सध्या परदेशात वास्तव्यास आहे. अभिनयाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे मुलाला पुरेसा वेळ देता आला नाही. त्यामुळे त्याचे संगोपन प्रामुख्याने आजी आणि मामांनी केले. याच कारणामुळे मुलाने एकदा, "तुम्ही मला फक्त जन्म दिला, माझी खरी आई माझी आजीच होती," असे सांगितल्याचे त्यांनी भावूक होत आठवले.

1987 पासून एकटेपणाचा प्रवास

गेल्या चार दशकांहून अधिक काळ उषा नाडकर्णी एकट्याच राहत आहेत. सुरुवातीला एकटं राहण्याची भीती वाटत होती. रात्री घरी येताना वॉचमनला सोबत यायला सांगायच्या. मात्र, कालांतराने त्यांनी या एकटेपणाशी मैत्री केली.

आज 80 व्या वर्षी त्या स्वतःची सर्व कामे स्वतःच सांभाळतात. मृत्यूची भीती वाटते का, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी शांतपणे उत्तर दिले की, मृत्यू कधी आणि कसा येईल हे कोणाच्याच हातात नसते. त्यामुळे त्या भविष्याची चिंता न करता प्रत्येक दिवस स्वीकारून जगत असल्याचे त्यांनी सांगितले.

Usha Nadkarni Personal Life
Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

अभिनयाची आवड कायम

वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटे आली, तरी अभिनयावरील प्रेम कधीच कमी झाले नाही. आजही त्या आपल्या कामाबद्दल तितक्याच समर्पित असून, अभिनय हेच आपल्या आयुष्याचे सर्वात मोठे बळ असल्याचे त्या मानतात. त्यांच्या संघर्षमय प्रवासाने अनेकांसाठी प्रेरणेचा आदर्श निर्माण केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com