Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Tarun Tejpal Sentenced 10 Years Imprisonment: न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठाने तेजपालला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दोषी ठरवत 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
Tarun Tejpal Sentenced 10 Years Imprisonment
Tarun TejpalDainik Gomantak
Published on
Updated on

Tarun Tejpal Sentenced 10 Years Imprisonment: तहलका मॅगझिनचा संस्थापक तरुण तेजपाल याला लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मोठा दणका दिला. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठाने तेजपालला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दोषी ठरवत 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यासोबतच तेजपालला पुढील दोन आठवड्यांच्या आत पोलिसांसमोर सरेंडर करण्याचा आदेश देण्यात आला. 2012 मध्ये गोव्याच्या स्थानिक न्यायालयाने तेजपालची या प्रकरणातून सुटका केली होती, तो निर्णय उच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्दबातल केला.

हे संपूर्ण प्रकरण नोव्हेंबर 2013 मधील आहे. गोव्यातील एका आलिशान रिसॉर्टच्या लिफ्टमध्ये 'तहलका'मध्येच काम करणाऱ्या एका महिला पत्रकाराचा तरुण तेजपालने लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप झाला होता. त्यावेळी हे प्रकरण देशात चांगलेच गाजले होते. पोलिसांनी नोव्हेंबर 2013 मध्येच तेजपालला अटक केली होती.

Tarun Tejpal Sentenced 10 Years Imprisonment
Tarun Tejpal Acquittal Appeal: तेजपाल प्रकरणात निकाल राखीव उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद; क्लीन चिट कायम राहणार का?

पुढे 2017 मध्ये न्यायालयाने त्याच्यावर अधिकृतरित्या गुन्ह्याचे आरोप निश्चित केले. मात्र, तेजपालने स्वतःवर झालेले सर्व आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता. त्याने हा खटलाच रद्द व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती, पण सर्वोच्च न्यायालयाने खटला थांबवण्यास नकार देऊन सुनावणी लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

Tarun Tejpal Sentenced 10 Years Imprisonment
Tarun Tejpal Case: तेजपाल लैंगिक छळ प्रकरण: पीडितेच्या विधानांतील विसंगतींवर बचाव पक्षाने ठेवले बोट, सुनावणी अंतिम टप्प्यात

यानंतर मे 2021 मध्ये सत्र न्यायालयाने पुराव्यांची कमतरता असल्याचे सांगत तरुण तेजपालला सर्व आरोपातून मुक्त केले होते. सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करु शकला नाही, असे कनिष्ठ न्यायालयाचे म्हणणे होते. परंतु, या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत गोवा सरकारने तातडीने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले. उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे पुन्हा एकदा बारकाईने तपासण्यात आले.

Tarun Tejpal Sentenced 10 Years Imprisonment
Tarun Tejpal Case: तेजपाल विरोधातील बलात्कारप्रकरणाचा निवाडा 21 मेपर्यंत तहकूब

अखेर मुंबई उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्दोष मुक्ततेचा निर्णय फिरवत तरुण तेजपालला दोषी घोषित केले. भारतीय दंड संहितेच्या बलात्काराशी संबंधित गंभीर कलमांनुसार त्याला ही 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तब्बल 13 वर्षांनंतर आलेल्या या निर्णयामुळे पीडित महिला पत्रकाराला अखेर न्याय मिळाला असल्याचे मानले जात असून, या निकालाची संपूर्ण देशात मोठी चर्चा सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com