Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Gujrat Well Water Waves Viral Video: गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील वीरपरडा गावातील एका विहिरीने पुन्हा एकदा नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Gujrat Well Water Waves Viral Video
Gujrat Well Water Waves Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील वीरपरडा गावातील एका विहिरीने पुन्हा एकदा नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून या विहिरीतील पाणी कोणत्याही बाह्य कारणाशिवाय समुद्रातील लाटांप्रमाणे सतत डोलताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या अनोख्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर गावात नागरिकांची गर्दी वाढली असून परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

वीरपरडा गावातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सुमारे 18 फूट खोल विहिरीत गेल्या चार दिवसांपासून पाण्यात लाटा निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही काळ ही हालचाल थांबली होती, मात्र पुन्हा दुपारच्या सुमारास पाणी डोलू लागल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेकांनी या घटनेचे व्हिडिओ चित्रीत करून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Gujrat Well Water Waves Viral Video
Goa Politics: 'आरजी'कडून निलंबित खोलकरांना चौकशीसाठी नोटीस; 7 ऑगस्‍टला हजर राहण्‍याचे निर्देश

ग्रामस्थांमध्ये विविध चर्चा

या रहस्यमय घटनेमुळे काही ग्रामस्थांनी धार्मिक श्रद्धेच्या भावनेतून पूजा-अर्चा करण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी या भागाचा भूकंपप्रवण क्षेत्राशी संबंध असल्याने भूगर्भातील हालचालींमुळे असे घडत असावे, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र या दाव्याला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

अधिकाऱ्यांची प्राथमिक तपासणी

घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासन आणि भूवैज्ञानिक विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासणीत ही हालचाल भूवैज्ञानिक आणि नैसर्गिक कारणांमुळे होत असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. अलीकडील मुसळधार पावसामुळे विहिरीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुनर्भरण (Recharge) झाला असून, त्यासोबत वाऱ्याचा प्रभावही पाण्याच्या हालचालीस कारणीभूत ठरू शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Gujrat Well Water Waves Viral Video
Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

तपास सुरूच, घाबरण्याचे कारण नाही

प्राथमिक तपासात भूकंप किंवा इतर कोणत्याही मोठ्या भूगर्भीय संकटाचे संकेत आढळले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तरीही या अनोख्या घटनेवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून विहिरीतील पाण्याची हालचाल नेमकी कशामुळे होत आहे, याचा सखोल अभ्यास सुरू आहे. दरम्यान, या रहस्यमय विहिरीमुळे मोरबीतील वीरपरडा गाव सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com