Goa Water Crisis Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Water Crisis: आज पाणी वाहून जातेय, उद्या थेंबासाठी वणवण! संभाव्य पाणीटंचाईवर आताच नियोजन करा

Goa Water Shortage Problem: पाण्याच्या प्रश्नावर उपचार म्हणून संबंधित मंत्र्यांकडून वेळोवेळी निवेदने जारी केली जातात.

गोमंतक ऑनलाईन टीम

उमाकांत शेट्ये

पाण्याच्या प्रश्नावर उपचार म्हणून संबंधित मंत्र्यांकडून वेळोवेळी निवेदने जारी केली जातात.‘सगळी धरणे भरलेली आहेत’ ‘बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवले जात आहे’, ‘गरज पडल्यास खाण खंदकांतील पाणी उपसून ते शुद्ध करून पिण्यास पुरवले जाईल’,या सगळ्या गोष्टी ऐकायला नक्कीच बऱ्या वाटतात.

येणाऱ्या वर्षी पाणीटंचाईला आपणा सर्वांना तोंड द्यावे लागणार, हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. कारण पाऊस कितीही पडला तरी पाणीटंचाई आपल्या पाचवीलाच पुजलेली आहे. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी वाहून समुद्राला जाऊन मिळते. त्या वेळी मात्र त्याची किंमत आपल्याला कळत नाही.

काही वर्षांपूर्वी कामानिमित्त तेव्हाचे मद्रास, म्हणजेच आताचे चेन्नई येथे गेलो होतो. तेथे आपल्या इथे दूधाच्या बाटल्या दिसतात, त्याप्रमाणे पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवलेल्या पाहून मी अचंबित झालो होतो. फक्त तोंडात बोट घालण्याचेच बाकी होते! ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, अशा घोषणा आपण नेहमी ऐकतो. मात्र त्यासंदर्भात प्रत्यक्षात किती कार्यवाही होते, यावर लक्ष ठेवणारे कोण आहे, हेच कळत नाही. पाण्याच्या प्रश्नाबाबत संबंधित यंत्रणा किती गंभीर आहे, हा एक अनुत्तरित प्रश्न आहे.

पाण्याच्या प्रश्नावर उपचार म्हणून संबंधित मंत्र्यांकडून वेळोवेळी निवेदने जारी केली जातात. ‘सगळी धरणे भरलेली आहेत’, ‘आगामी ऑगस्टपर्यंत पुरेसा पाणीसाठा आहे’, ‘बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवले जात आहे’, ‘गरज पडल्यास खाण खंदकांतील पाणी उपसून ते शुद्ध करून पिण्यासाठी पुरवले जाईल’,या सगळ्या गोष्टी ऐकायला नक्कीच बऱ्या वाटतात.

लहानपणी कोल्ह्यांच्या गोष्टी ऐकल्या होत्या. रात्री कोल्हे एकत्र बसतात, चर्चा करतात, ‘असे करू, तसे करू’, अशा योजना आखतात. आपल्या सरकारांप्रमाणे त्यांना कोट्यवधींची त्यासाठी तरतूद करावी लागते, हे मात्र त्यांना बहुधा माहीत नसावे. वा कदाचित त्यांना पैशाचा तेवढा लोभ नसावा! दुसरा दिवस उजाडला की हे कोल्हे आपापल्या वाटेने निघून जातात. रात्री आपण काय ठरवले होते, कोणत्या योजना आखल्या होत्या, हे ते कसे काय विसरतात? यालाच सोयीस्करपणे विसरणे म्हणायचे का?

पैशाचा लोभ हा माणसाचा गुण कोल्ह्यांनी घेतला नाही; पण काल काय ठरवले होते, हे एका रात्रीत विसरण्याचा त्यांचा गुण आपण माणसांनी शंभर टक्के उचलला आहे, असे मात्र नक्कीच म्हणावे लागेल! नाहीतर ‘पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही’, अशी मोठमोठी आश्वासने मिळूनही वेळेवर नळाला पाणी येईलच, याची शंभर टक्के खात्री देणारा एखादा मंत्री बहुधा नसावा. मडकई येथील ‘गेल’ म्हणजेच गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या स्टेशन जवळील चेंबरमधून मागील बरेच दिवस रात्र दिवस मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. त्याची दुरूस्ती करणे संबंधितांना जमत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.

आज वाहून जाणाऱ्या प्रत्येक थेंबाची किंमत उद्या कळेल. त्यामुळे पाणीटंचाई उद्‌भल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन आतापासूनच नियोजन करणे, गळती रोखणे, काटकसरीने वापर यावर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा यंदाही घोषणा होतील, पाणीटंचाई आली की पुन्हा त्याच प्रश्नावर चर्चा सुरू होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Porel Century: "माझ्या आयुष्यात खूप काही घडलं...", जेलमधून सुटल्यानंतर पठ्ठ्यानं लगावलं शतक; अभिषेक पोरेल ढसाढसा रडला

Drug Trafficking: हैदराबाद-गोवा ड्रग्ज कनेक्शन उघड! फरार आरोपीला गोव्यातून अटक; 48.4 लाखांच्या व्यवहारांची चौकशी

India GDP Growth: सुपरपॉवर इंडिया! जागतिक मंदीच्या काळात भारताची अर्थव्यवस्था सुस्साट; IMF ने वाढवला देशाचा ग्रोथ रेट

Goa Politics: 'लोबोंमुळे भाजप सोडण्याची वेळ आली'! रोशन रेडकरांचा राजीनामा; 'बर्च'प्रकरणी खुल्या चर्चेचे आव्हान

Luthra Brothers Bail: लुथरा बंधूंना अखेर जामीन; पण कोर्टाच्या 6 कठोर अटी! पासपोर्ट जमा करण्याचेही आदेश

SCROLL FOR NEXT