Indian Super League: चर्चिल ब्रदर्सची अखेरपर्यंत कडवी झुंज, पण मोहन बागानचा 2-1 ने विजय; गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप

mohun bagan super giant vs churchill brothers isl: गोव्यातील संघाला इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यात २-१ फरकाने पराभूत व्हावे लागले. रंगतदार ठरलेला सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.
mohun bagan super giant vs churchill brothers isl
Indian Super LeagueDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: माजी विजेत्या मोहन बागान सुपर जायंट संघाला चर्चिल ब्रदर्सने रविवारी चांगलेच झुंजविले, विशेषतः अखेरच्या पाच मिनिटांतील खेळात कोलकत्यातील संघ कमालीचा दबावाखाली आला, पण अखेरीस संघर्ष करूनही गोव्यातील संघाला इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यात २-१ फरकाने पराभूत व्हावे लागले. रंगतदार ठरलेला सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

मोहन बागानचा संघ आता आयएसएल गुणतक्त्यात अव्वल स्थानी आला आहे. सामन्याच्या २७व्या मिनिटास लाल्लियानझुआला छांगटे याच्या गोलमुळे मोहन बागानने आघाडी घेतली. बदली खेळाडू अनिरुद्ध थापा याने ६२व्या मिनिटास पाहुण्या संघाच्या खाती आणखी एका गोलची भर टाकली. दोन गोलच्या आघाडीनंतरही मोहन बागानला घाम गाळावा लागला.

mohun bagan super giant vs churchill brothers isl
Indian Super League: सामना सुरू होताच एफसी गोवाचा धमाका! नेमिलच्या 34व्या सेकंदातील गोलने नॉर्थईस्टला नमवले; 1-0 ने विजय

सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात चर्चिल ब्रदर्सला पेनल्टी फटका मिळाला. त्यांच्या व्हिन्सी बार्रेटो याला गोलक्षेत्रात मोहन बागानच्या मनवीर सिंग याने पाडले होते. बदली खेळाडू सेबॅस्टियन गुटिएरेझ याने अचूक नेम साधत यजमान संघाची पिछाडी १-२ अशी कमी केली. बाकी वेळेत, तसेच भरपाई वेळेतील खेळात चर्चिल ब्रदर्सने बरोबरीच्या गोलसाठी आटोकाट प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे स्पर्धेतील दुसऱ्या विजयाचे प्रयत्न अखेर हुकलेच. मोहन बागानचा गोलरक्षक विशाल कैथ याने दक्षता कायम राखली.

mohun bagan super giant vs churchill brothers isl
Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

सलग पाचवा विजय

मोहन बागानचा हा स्पर्धेतील सलग पाचवा विजय ठरला. सहा सामन्यानंतर त्यांचे आता १५ गुण झाले आहेत. यासह त्यांनी बंगळूर एफसीला (१३ गुण) मागे ढकलत अग्रस्थान मिळविले आहे. चर्चिल ब्रदर्सला सलग चौथा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पाच लढतीनंतर तीन गुणांसह ते दहाव्या क्रमांकावर कायम राहिले. चर्चिल ब्रदर्सचा स्पर्धेतील पुढील सामना २७ रोजी पुणे येथे इंटर काशी संघाविरुद्ध खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.