

पणजी: ‘बर्च’ आग दुर्घटनेवर आमदार मायकल लोबो आणि दिलायला लोबो यांच्याशी खुली चर्चा करण्याचे आव्हान हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकर यांनी दिले आहे. या प्रकरणात आपला कोणताही संबंध नसताना आपल्याला गोवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी लोबो दाम्पत्याने कुठेही थेट चर्चेला यावे, असे म्हटले आहे. दरम्यान, रेडकर यांनी चिंबल पठारावरील ‘अटल भवन’ येथे जाऊन भाजप सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला.
राजीनाम्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रेडकर यांनी, आपण भाजपमध्ये असूनही आमदार मायकल लोबो यांच्यामुळे पक्ष सोडावा लागत असल्याचा आरोप केला. आमदार लोबो यांनी दुर्घटनेनंतर रेडकर यांचे नाव घेऊन काही आरोप केले होते. त्यामुळे रेडकर नाराज झाले होते. भाजपमधील काही नेत्यांविषयीही त्यांनी यापूर्वी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आता पक्षसदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी लोबो दाम्पत्याला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.
पत्नीच्या विजयामुळे राजकीय वर्चस्वाची चर्चा
‘बर्च बाय लेन’ आग प्रकरणानंतर रोशन रेडकर यांना सरपंचपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर त्यांच्या प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी विजयी झाल्या. या विजयामुळे प्रभागातील रेडकर यांचा प्रभाव कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.