

Goa Made Liquor Seized In Malvan
मालवण : शहरातील रेवतळे परिसरात अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत गोवा बनावटीची तब्बल १ लाख ५८ हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. रविवार, २२ नोव्हेंबर रोजी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी रेवतळे येथील विलास गणपत मुणगेकर यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.
मालवण शहरातील रेवतळे येथे गोवा बनावटीची दारू अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी तपासणीदरम्यान १ लाख ५८ हजार रुपये किमतीचा दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी हा संपूर्ण साठा जप्त केला.
गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात अवैधरित्या विक्रीसाठी आणली जात असल्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मालवणमधील या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत भोसले, हेड कॉन्स्टेबल हुंबे आणि हेड कॉन्स्टेबल पेडणेकर यांचा समावेश होता. पोलिसांनी दारूसाठा जप्त करून संबंधित व्यक्तीविरोधात कारवाई केली आहे. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.