Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

"आम्ही यूज अँड थ्रो वाला टिश्यू पेपर नाही": इम्रान खान

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी होणार्‍या अविश्वास ठरावाच्या एक दिवस आधी देशाला संबोधित केले. यादरम्यान, ते म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आपल्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाबाबत उपराष्ट्रपतींचा निर्णय रद्दबातल ठरवल्याबद्दल खेद वाटतो.'

दरम्यान इम्रान खान म्हणाले, ''सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो, पण सत्ता उलथवण्याचा डाव आहे की नाही, याकडे सर्वोच्च न्यायालयाने लक्ष न दिल्याने आमची निराशा झाली आहे. त्यासंबंधीची चौकशी न्यायालयाने करायला हवी होती. पाकिस्तानी तरुण आपले भविष्य आहे. परंतु देशातील सध्याच्या स्थितीकडे जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांना वाटत असेल की, आपले राजकीय पुढारी विवेकाने वागत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापुढे आपण कोणते उदाहरण ठेवू.''

खान पुढे म्हणाले, '' सध्या खासदारांची खुलेआम खरेदी-विक्री होत आहे, विवेकाची कोण विक्री करतयं हे पाकिस्तानातील जनतेला चांगल समजतं. शरीफ बंधूंनी सर्वप्रथम मेंढ्या-बकऱ्यांप्रमाणे राजकारण्यांना विकत घेण्याची प्रक्रिया सुरु केली. आता राखीव जागाही विकल्या जात आहेत. त्यामुळे याच्या विरोधात उभे राहणे ही पाकिस्तानातील जनतेची जबाबदारी आहे. आपल्या देशातील विदेशी दूतावासातून सत्ता उलथवण्याचा कट रचण्यात आला. यासंबंधीचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत. मात्र आम्ही ते पुरावे आताच सार्वजनिक करणार नाही. सध्या घडत असणाऱ्या राजकीय घडामोडीकडे पाकिस्तानी जनता पाहत आहे.''

याशिवाय खान पुढे म्हणाले, ''मी परदेशातही राहिलो, पण असा भ्रष्टाचार कधीच पाहिला नाही. माझा गुन्हा नेमका काय आहे ते सांगा. सत्तेत असताना मी देशात ड्रोन हल्ले होऊ दिले नाहीत. दुसरीकडे, अफगाणिस्तानात (Afghanistan) लष्करी कारवाई करुन कोणताही तोडगा निघू शकत नाही, असे मी उघडपणे यापूर्वी सांगितले होते. इराकमधील युद्धाला मी उघडपणे विरोध केलाय. तर शरीफ आणि झरदारी हे अमेरिकेचे कठपुतळीप्रमाणे वागत आहेत.''

शेवटी खान म्हणाले, ''आम्ही यूज अँड थ्रो वाला टिश्यू पेपर नाही. भारत हा स्वाभिमानी देश आहे. त्यामुळे कोणताही देश त्यांच्याकडे डोळे वर करुन पाहत नाही. परंतु पाकिस्तानात पुन्हा नव्याने लोकशाही बहाल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दरम्यान एका अमेरिकन अधिकाऱ्याने आमच्या राजदूताला उघडपणे सांगितले होते की, इम्रान खान सत्तेतून पायउतार झाल्यास पाकिस्तानच्या अडचणी संपतील आणि अमेरिका उदारमनाने माफ करु शकते.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

United Nations: इस्रायलच्या समर्थनार्थ पहिल्यांदाच UN बैठक, अमेरिकेने दिला पूर्ण पाठिंबा; इस्त्रायली लष्कर राफाह शहरात घुसले!

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

SCROLL FOR NEXT