इम्रान खान पाकिस्तान सोडून भारतात का जात नाहीत?; विरोधकांचा निशाणा

क्रिकेटमुळे मला भारतात खूप मान मिळाला: इम्रान खान
Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak

पाकिस्तान मुस्लीम लीगच्या नेत्या मरियम नवाझ शरीफ यांनी भारताचे कौतुक करणाऱ्या पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आहे. मरियम म्हणाल्या, सत्ता जात असल्याचे पाहून वेडा झालेल्या या व्यक्तीला त्यांच्या पक्षानेच बाहेरचा रस्ता दाखवला आहे. जर तुम्हाला भारत इतका आवडत असेल तर तुम्ही पाकिस्तान सोडून तिथे का स्थलांतरित होत नाही. (Pakistan PM Imran Khan should settle in India, taunts opposition leader)

Imran Khan
इम्रान खान आज पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून पायउतार होणार?

जेव्हापासून पाकिस्तानमध्ये (Pakistan) इम्रान खानच्या विरोधात विरोधकांनी आघाडी उघडली आहे, तेव्हापासून इम्रानने भारताच्या परराष्ट्र धोरणाचे अनेकदा कौतुक केले आहे. शुक्रवारी जनतेला संबोधित करताना इम्रान खान यांनी भारताचे (India) कौतुक केले. इम्रामने देशाला संबोधित केल्यानंतर मरियमने त्यांच्यावर निशाणा साधला. मरियमने ट्विट करून म्हटले की, “मी पहिल्यांदाच एखाद्याला सत्तेसाठी असे रडताना पाहिले आहे. जे लोक भारताची स्तुती करत आहेत, त्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की भारताच्या विविध पंतप्रधानांविरुद्ध 27 अविश्वास प्रस्ताव आले आहेत, मात्र कोणीही संविधान, लोकशाही आणि नैतिकतेशी खेळले नाही. वाजपेयी एका मताने हरले, घरी गेले. पण त्यांनी तुमच्यासारखे देशाला, संविधानाला आणि राष्ट्राला ओलीस ठेवले नाही!

Imran Khan
रशियाला G20 मधून बाहेर काढणे सोपे नाही

काय म्हणाले इम्रान?
भारताचे कौतुक करताना इम्रान म्हणाले, भारत पाकिस्तानसोबत स्वतंत्र झाला होता. क्रिकेटमुळे मला तिथे खूप मान मिळाला, प्रेम मिळाले. केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीमुळे आणि भारत सरकारने काश्मीरबाबत जे काही केले आहे त्यामुळे आमचे संबंध चांगले नाहीत. माझे भारताशी शत्रुत्व नाही. पण आज कोणतीही महासत्ता भारतासाठी बिकट परिस्थिती निर्माण करू शकत नाही. आज भारत सर्व निर्बंधांना न जुमानता रशियाकडून (Russia) तेल खरेदी करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com