JD Vance Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: अमेरिकेला डावललं अन् पाकड्यांना जवळ केलं! कतारच्या PM चा 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नक्की काय घडलं?

Qatar PM Ignores JD Vance Viral Video: स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या शांतता चर्चेदरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Manish Jadhav

Qatar PM Ignores JD Vance Viral Video: स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या शांतता चर्चेदरम्यान एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी हे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हॅन्स यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, कतारच्या पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी जे. डी. व्हॅन्स तिथे उभे आहेत आणि ते हस्तांदोलनासाठी हातही पुढे करतात. मात्र, कतारचे पंतप्रधान त्यांना पूर्णपणे दुर्लक्ष करत थेट त्यांच्या बाजूला उभे असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे जातात आणि त्यांना मिठी मारतात. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाली असून, अमेरिकेच्या (America) उपराष्ट्रपतींचा हा अपमान असल्याचा दावा अनेक युजर्स करत आहेत. मात्र, या दोन्ही देशांच्या अधिकृत प्रतिनिधींनी यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

ही घटना स्वित्झर्लंडमधील लेक ल्युसर्नच्या किनाऱ्यावर असलेल्या बर्गनस्टॉक रिसॉर्टमध्ये रविवारी पार पडलेल्या एका विशेष बैठकीदरम्यान घडली. या बैठकीत अमेरिका, इराण, पाकिस्तान आणि कतार या चार देशांचे नेते उपस्थित होते. अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराच्या तांत्रिक पैलूंवर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी ही बैठक बोलावली गेली होती, ज्यामध्ये कतार आणि पाकिस्तान हे मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. या बैठकीदरम्यान केवळ कतारच्या पंतप्रधानांकडूनच नव्हे, तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याकडूनही जे. डी. व्हॅन्स यांच्याशी कोणताही संवाद साधला गेला नाही.

जे. डी. व्हॅन्स यांच्या भाषणापूर्वी अराघची रुममध्ये आले, त्यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांची गळाभेट घेतली, पण व्हॅन्स यांच्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले.

असे असले तरी, अमेरिका आणि इराण यांच्यातील ही द्विपक्षीय चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही देशांनी कराराशी संबंधित अनेक महत्त्वाचे तपशील सामायिक केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने इराणच्या तेल विक्रीवरील निर्बंध उठवणे आणि युद्धादरम्यान बंद करण्यात आलेली महत्त्वाची 'होर्मुझची सामुद्रधुनी' पुन्हा खुली करणे यासारख्या जागतिक दृष्ट्या संवेदनशील मुद्द्यांचा समावेश आहे. सोमवार सकाळी मध्यस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वित्झर्लंडमधील इराण युद्ध कायमचे संपवण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही उच्च-स्तरीय राजकीय चर्चा आता यशस्वीपणे पूर्ण झाली असून, दोन्ही देशांमधील तांत्रिक पातळीवरील चर्चा पुढील संपूर्ण आठवडाभर सुरु राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT