Donald Trump: "मी राष्ट्राध्यक्ष व्हावं असं त्याला वाटत नव्हतं..." अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एपस्टीनसोबतच्या मैत्रीवर ट्रम्प बोलले

Donald Trump Jeffrey Epstein Statements: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टीन प्रकरणावर पहिल्यांदाच अत्यंत परखड आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Donald Trump Jeffrey Epstein Statements
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

Donald Trump Jeffrey Epstein Statements: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टीन प्रकरणावर पहिल्यांदाच अत्यंत परखड आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. 'एअर फोर्स वन' या राष्ट्राध्यक्षांच्या विमानात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ट्रम्प यांनी दावा केला की, एपस्टीन प्रकरणाशी त्यांचा दुरान्वयेही संबंध नाही आणि या संपूर्ण प्रकरणात ते पूर्णपणे निर्दोष आहेत.

विरोधकांकडून या मुद्द्यावर वारंवार प्रश्न उपस्थित केले जात असताना ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले की, त्यांच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही. तपास यंत्रणांनी आपल्याला आधीच क्लीन चिट दिली असून, जे काही आरोप केले जात आहेत ते सर्व निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विधानाद्वारे त्यांनी स्वतःला या वादातून पूर्णपणे बाजूला करण्याचा प्रयत्न केला आहे.


Donald Trump Jeffrey Epstein Statements
Donald Trump: "आंदोलकांना फाशी द्याल याद राखा!" ट्रम्प यांची इराणला खुली धमकी; आखाती देशांत युद्धाचे ढग गडद Watch Video

या संवादादरम्यान ट्रम्प यांनी एक अत्यंत धक्कादायक खुलासा करुन अमेरिकन राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांच्या मते, जेफ्री एपस्टीन हा त्यांचा समर्थक नव्हता, तर तो त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या विरोधात सक्रिय होता.

ट्रम्प म्हणाले की, "खरे तर जेफ्री एपस्टीन एका लेखकाच्या मदतीने मी निवडणूक जिंकू नये यासाठी प्रयत्न करत होता. तो माझ्या विजयाच्या विरोधात काम करत होता." या विधानामुळे ट्रम्प आणि एपस्टीन यांच्यातील संबंधांबाबत होणाऱ्या चर्चेला आता एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. एपस्टीनने ट्रम्प यांच्या विरोधात मोहीम राबवली होती, असा दावा करुन डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले आहेत.


Donald Trump Jeffrey Epstein Statements
Donald Trump: 'नोबेल मिळाला नाही, आता मी शांततेचा विचार करणार नाही'; ट्रम्प यांचं नॉर्वेला खळबळजनक पत्र, ग्रीनलँडवर ठोकला दावा!

जेफ्री एपस्टीन हे अमेरिकेतील एक अत्यंत वादग्रस्त नाव आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलींची तस्करी आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप होते. 2019 मध्ये तुरुंगात असतानाच त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. एपस्टीनचे अमेरिकेतील अनेक श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांशी जवळचे संबंध होते, त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद वारंवार अमेरिकन राजकारणात उमटत असतात.


Donald Trump Jeffrey Epstein Statements
Donald Trump: "मीच नाटोचा तारणहार!" डोनाल्ड ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा धमाका; ग्रीनलँडवर फडकणार अमेरिकेचा झेंडा?

गेल्या महिन्यात अमेरिकेच्या (America) न्याय विभागाने एपस्टीनशी संबंधित सुमारे 30 लाख पानांची कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. 'एपस्टीन फाईल ट्रान्सपरन्सी ॲक्ट' अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून यातून शक्तिशाली लोकांचे एपस्टीनशी असलेले धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी दिलेले स्पष्टीकरण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com