Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

Donald Trump g7 Summit France Statement: फ्रान्समध्ये आयोजित G7 शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एक अत्यंत खळबळजनक विधान केले.
benjamin netanyahu & donald trump
benjamin netanyahu & donald trumpDainik Gomantak
Published on
Updated on

Donald Trump g7 Summit France Statement: फ्रान्समध्ये आयोजित G7 शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एक अत्यंत खळबळजनक विधान केले असून, यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली. कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी होणाऱ्या महत्त्वाच्या भेटीपूर्वी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी इस्रायल आणि अमेरिकेच्या संबंधांवर थेट भाष्य केले. ट्रम्प म्हणाले की, जर अमेरिकेचा आणि विशेषतः त्यांचा पाठिंबा नसता, तर आज इस्रायलचे अस्तित्वच उरले नसते.

तेल अवीव खूप आधीच उद्ध्वस्त झाले असते. असे असले तरी, त्यांनी लेबनॉनमधील युद्धाच्या मुद्द्यावरुन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून त्यांना अधिक जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला.

benjamin netanyahu & donald trump
Donald Trump Tariff Cut: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! शेती आणि औद्योगिक उपकरणांवरील आयात शुल्कात 10 टक्क्यांची कपात; डिसेंबर 2027 पर्यंत मिळणार सूट

सध्या इस्रायल आणि इराण (Iran) समर्थित हिजबुल्लाह यांच्यातील लष्करी संघर्ष तीव्र झाला असून यावर ट्रम्प यांनी कडक शब्दांत टीका केली. लेबनॉनच्या दक्षिण भागात इस्रायली सैन्याने नुकत्याच केलेल्या हल्ल्यांचा उल्लेख करत ट्रम्प यांनी संकेत दिले की, ते या कारवाईमुळे प्रचंड नाराज आहेत. कारण हा हल्ला अमेरिका आणि इराण यांच्यात अंतरीम शांतता कराराची घोषणा होण्याच्या अगदी काही वेळ आधी करण्यात आला.

benjamin netanyahu & donald trump
Donald Trump: अमेरिकेत नवा वाद! जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन यांच्या पंक्तीत आता डोनाल्ड ट्रम्प; 'त्या' फोटोनं जगाला चक्रावलं

ट्रम्प यांनी इस्रायली लष्कराच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करताना म्हटले की, जेव्हा तुम्ही एखाद्या शत्रूचा शोध घेत असता, तेव्हा प्रत्येक वेळी संपूर्ण इमारत जमीनदोस्त करण्याची गरज नसते. त्या अपार्टमेंट्समध्ये अनेक निष्पाप लोक राहतात आणि ते सर्व काही हिजबुल्लाहचे सदस्य नाहीत. या युद्धात खूप दीर्घकाळापासून निष्पाप लोकांचे बळी जात आहेत, जे आता थांबले पाहिजे.

benjamin netanyahu & donald trump
Donald Trump: "आंदोलकांना फाशी द्याल याद राखा!" ट्रम्प यांची इराणला खुली धमकी; आखाती देशांत युद्धाचे ढग गडद Watch Video

लेबनॉनमध्ये सुरु असलेल्या या संघर्षाला ट्रम्प यांनी एक 'छोटी-मोटी लढाई' असे संबोधले. त्यांनी स्पष्ट केले की, जरी इस्रायलने बैरुतवर आपले हल्ले सुरु ठेवले, तरीही इराणसोबतचा शांतता करार कायम राहील. परंतु, इस्रायलने ज्या पद्धतीने लेबनॉन आणि हिजबुल्लाहचे प्रकरण हाताळले, त्यावरुन ते अजिबात समाधानी नाहीत. दुसरीकडे, इराणने वॉशिंग्टनसोबतच्या कोणत्याही युद्धविराम करारात लेबनॉनचा समावेश असावा यावर भर दिला, मात्र इस्रायल हिजबुल्लाहविरुद्धची आपली लष्करी मोहीम सुरु ठेवण्यावर ठाम आहे.

benjamin netanyahu & donald trump
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प Apple CEO टिम कुक यांना सांगतायेत, 'भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही'

जेव्हा पत्रकारांनी ट्रम्प यांना पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबतच्या वैयक्तिक संबंधांविषयी विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की नेतन्याहू यांच्याशी त्यांचे संबंध नेहमीच खूप चांगले राहिले आहेत. मात्र, आता वेळ आली आहे की नेतन्याहू यांनी लेबनॉनच्या प्रकरणात अधिक जबाबदार भूमिका घेतली पाहिजे. ट्रम्प यांच्या या विधानामुळे आगामी काळात अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांना कोणते नवे वळण मिळते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com