Pakistan New Visa Policy Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan New Visa Policy: पाकिस्तानने घेतला मोठा निर्णय, व्हिसा पॉलिसीत केला बदल!

Pakistan New Visa Policy: पाकिस्तान आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करत आहे.

Manish Jadhav

Pakistan New Visa Policy: पाकिस्तान आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करत आहे.

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने आपल्या ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या उद्देशाने जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन व्हिसा धोरण आणले आहे.

अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला आपल्या देशात परदेशी गुंतवणूक वाढवायची आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, आर्थिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी मागील शाहबाज शरीफ सरकारने (Government) स्थापन केलेल्या 'स्पेशल इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटी कौन्सिल' (SIAFC) अंतर्गत दोन दिवसीय बैठकीत हा निर्णय घेतला होता.

व्हिसा धोरण मंजूर

काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर यांनी SIFC च्या पाचव्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या परदेशी उद्योगपतींसाठी सुलभ व्हिसा प्रणाली मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी रेकॉर्ड केलेल्या मेसेजमध्ये जाहीर केले.

निवेदन जारी केले

ते म्हणाले की, पाकिस्तानात येऊ इच्छिणाऱ्या परदेशी उद्योगपतींना त्यांच्या देशाच्या किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार संस्थांकडून एका दस्ताऐवजाच्या आधारे सुलभ व्हिसा जारी केला जाईल.

या निवेदनात काकर यांनी म्हटले की, जर पाकिस्तानच्या व्यापार संघटना किंवा व्यावसायिक संघटनांनी कोणत्याही परदेशी व्यावसायिकाला कोणतेही दस्तऐवज जारी केले तर त्यांनाही सुलभ व्हिसा दिला जाईल.

पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार

नवीन व्हिसा नियमांनुसार, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला (Economy) उभारी मिळेल. त्यानंतर कार्यवाहक परराष्ट्र मंत्री जलील अब्बास जिलानी यांनी पत्रकारांना सांगितले की, SIFC ला पाकिस्तानच्या चीन, संयुक्त राष्ट्र आणि पश्चिम आशियाई देशांसोबतच्या संबंधांबद्दल माहिती देण्यात आली आहे.

या देशांना पाकिस्तानात गुंतवणूक करायची आहे

ते पुढे म्हणाले की, गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) देशांनी गुंतवणूक परिषदेत स्वारस्य दाखवले आहे. CCC मध्ये बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT