Pakistan Army: पाक लष्कराची थेट राष्ट्रपतींना धमकी, निवडणुकीची तारीख जाहीर कराल...

Pakistan Army: पाकिस्तानमध्ये राजकीय गोंधळ सुरुच आहे. इम्रान खान तुरुंगात गेल्यानंतरही हा गोंधळ थांबलेला नाही.
Pakistan President Arif Alvi
Pakistan President Arif AlviDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Army: पाकिस्तानमध्ये राजकीय गोंधळ सुरुच आहे. इम्रान खान तुरुंगात गेल्यानंतरही हा गोंधळ थांबलेला नाही. आता राष्ट्रपती आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात संघर्ष सुरु सुरु झाला आहे.

कारण पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी हे इम्रान खान यांचे समर्थक मानले जातात. अशा स्थितीत अल्वी यांना पाक लष्कराने घेरले आहे. अल्वी यांना निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापासून रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पाक लष्कर आणि शाहबाज शरीफ यांच्या युतीला निवडणुका (Election) शक्य तितक्या पुढे ढकलण्यात याव्यात, असे वाटते. तर निवडणुका वेळेवर व्हाव्यात अशी इम्रान खान यांची इच्छा आहे.

मात्र, इम्रान यांचे समर्थक असलेल्या अल्वी यांनी असे काही करु नये म्हणून पाक लष्कराने त्यांना घेरले आहे.

दरम्यान, राष्ट्रपती भवनाच्या चौथ्या मजल्यावर असलेले राष्ट्रपती कार्यालय शनिवारी नाट्यमय घडामोडीत पूर्णपणे रिकामे करण्यात आले. तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडण्यास सांगण्यात आले.

लष्करप्रमुख असीम मुनीर आणि आयएसआयचे डीजी जनरल नदीम अंजुम तिथे पोहोचण्यापूर्वीच पाकिस्तानी लष्कराने इमारतीच्या चौथ्या मजल्याचा ताबा घेतला. राष्ट्रपती भवनातील एका अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे.

खरे तर, शुक्रवारी लष्करप्रमुख आणि आयएसआय डीजी यांना माहिती मिळाला की, राष्ट्रपती अल्वी शनिवारी निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहेत. त्यामुळे ते राष्ट्रपतींना भेटायला गेले आणि त्यांना अशी कोणतीही घोषणा करण्यापासून रोखले.

Pakistan President Arif Alvi
Attack On Pakistan Army: बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या टार्गेटवर पाकिस्तानी लष्कर; हल्ल्यात 12 जवान ठार

घटनेनुसार 90 दिवसांत निवडणुका घ्याव्या लागतात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत लष्कराकडून राष्ट्रपती अल्वी यांना अयोग्य वागणूक दिली गेली. एका ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषकाचे म्हणणे आहे की, पाकिस्तानच्या घटनेनुसार सध्याची परिस्थिती पाहता 90 दिवसांत निवडणुका व्हायला हव्यात.

जर राष्ट्रपती अल्वी यांनी निवडणूकीची घोषणा केली असती तर पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात सुरु असलेल्या मोहिमेला मोठा धक्का बसला असता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर करणार असल्याची बातमी आली आहे, जेणेकरुन पाकिस्तानी लष्कराकडून (Pakistan Army) इम्रान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) वर चर्चेसाठी दबाव आणला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com