Netanyahu Trump meeting Dainik Gomantak
ग्लोबल

Netanyahu Nominates Trump: 'ट्रम्प शांतता घडवून आणत आहेत'! नेतान्याहूंचे प्रतिपादन; नोबेल शांतता पुरस्कारासाठी केली शिफारस

Trump Nobel Peace Prize: नेतान्याहू यांनी ‘व्हाइट हाउस’मध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. शिष्टमंडळ पातळीवर झालेल्या भेटीत दोन्ही नेत्यांनी इराणबरोबरील संघर्षाचा आढावा घेतला.

Sameer Panditrao

वॉशिंग्टन: इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी इराणवर निर्णायक विजय मिळाल्याचा दावा करतानाच पश्‍चिम आशियातील स्थिती लवकरच पूर्वपदावर येईल, असा विश्‍वास व्यक्त केला. नेतान्याहू यांनी यावेळी नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्या नावाची शिफारस करत असल्याचे जाहीर केले.

गाझा पट्टीतील संघर्षाला विराम देण्याबाबत चर्चा करण्यासाठी नेतान्याहू यांनी आज ‘व्हाइट हाउस’मध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. शिष्टमंडळ पातळीवर झालेल्या भेटीत दोन्ही नेत्यांनी इराणबरोबरील संघर्षाचा आढावा घेतला. तसेच, गाझामध्ये दोन महिन्यांची शस्त्रसंधी लागू करण्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये खलबते झाली.

या शस्त्रसंधीसाठी ट्रम्प हे किती कठोर धोरण राबविणार, याची चाचपणी नेतान्याहू यांनी यावेळी केल्याचे समजते. या चर्चेनंतर माध्यमांसमोर मात्र दोघांनी इराणवर विजय मिळविल्याचा दावा करतानाच पश्‍चिम आशियामध्ये शांततेचे नवे युग सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली. ट्रम्प म्हणाले,‘‘पश्‍चिम आशिया लवकरच पूर्वपदावर येईल, अशी मला खात्री आहे. यापुढे इराण आमचा आणि इस्राईलचा निश्‍चितच आदर करेल.

नोबेलसाठी शिफारस

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस केली आहे. ट्रम्प हे एकापाठोपाठ एका वादामध्ये शांतता घडवून आणत आहेत, असे नेतान्याहू म्हणाले. इराणवर लष्करी कारवाई करण्याची मागणी नेतान्याहू यांनी अमेरिकेच्या आधीच्या अध्यक्षांकडेही अनेकवेळा केली होती.

ट्रम्प यांनी अशी कारवाई करताना मागील महिन्यात इराणच्या अणुकेंद्रावर ‘बंकर बस्टर’ बाँब टाकला होता. त्यामुळेच नेतान्याहू यांनी त्या बदल्यात नोबेलसाठी ट्रम्प यांची शिफारस केल्याचे मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT