Israel Palestine Conflict: पॅलेस्टिनींवर पुन्हा गोळीबार! इस्राईलच्या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Israel Palestine War: इस्राईलने मदतसाहित्य गाझा पट्टीत आणण्यास परवानगी दिल्यापासून यावर नियंत्रण ठेवण्याचा इस्राईलचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी उभारलेल्या मदतकेंद्रांद्वारेच मदत साहित्याचे वाटप सुरू आहे.
Israel soldiers shooting Palestinians
Israel soldiers shooting PalestiniansDainik Gomantak
Published on
Updated on

देर अल बाला: गाझा पट्टीत मदतसाहित्य घेऊन येणाऱ्या ट्रकची वाट पाहणाऱ्या शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांवर इस्राईलच्या सैनिकांनी गोळीबार केला, तसेच ड्रोन हल्लाही केला. या माऱ्यात किमान २५ जणांचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जण जखमी झाले.

गाझा पट्टीतील नागरिक सध्या विविध देशांनी व संस्थांनी पाठविलेल्या मदतसाहित्यावरच अवलंबून आहेत. इस्राईलने मदतसाहित्य गाझा पट्टीत आणण्यास परवानगी दिल्यापासून यावर नियंत्रण ठेवण्याचा इस्राईलचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी स्वत: उभारलेल्या मदतकेंद्रांद्वारेच मदत साहित्याचे वाटप सुरू आहे.

आज वादीगाझा या भागात मदतसाहित्य घेऊन ट्रक येणार असल्याचे समजल्यानंतर शेकडो पॅलेस्टिनी नागरिक या भागात जमा झाले होते. ट्रक जवळ येत असतानाच नागरिक त्यादिशेने पुढे जात असताना इस्रायली सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. यामध्ये किमान २५ जणांचा मृत्यू झाला.

Israel soldiers shooting Palestinians
Israel Gaza Airstrikes: इस्रायलचा गाझावर हवाई हल्ला, 23 पॅलेस्टिनी ठार; तीन चिमुकल्यांनी गमावला जीव

भारतीयांची घरवापसी सुरूच

पश्‍चिम आशियातील युद्धामुळे आणि अशांततेमुळे भारतीयांचे मायदेशी परतणे सुरूच असून आतापर्यंत २२०० पेक्षा अधिक नागरिकांना पर्शियन आखााती देशांतून बाहेर काढले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ‘ऑपरेशन सिंधू’ बाबत माहिती दिली.

Israel soldiers shooting Palestinians
Israel-Gaza: शांततेची आशा! गाझामध्ये युद्धविराम लागू,15 मुलांसह 43 जणांचा मृत्यू

पहाटे ३.३० वाजता मशहदहून नवी दिल्लीला दाखल झालेल्या एका विशेष विमानाने २९२ भारतीयांना इराणहून मायदेशी आणल्याचे त्यांनी सांगितले. इराण-इस्राईल यांच्यातील युद्धामुळे भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधु सुरू करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com