China Warns India :PM मोदींच्या दलाई लामांना शुभेच्छा, चीन भारतावर नाराज; म्हणाला की, 'तिबेटसंबंधी मुद्द्यांची संवेदनशीलता समजून घ्यायला हवी..'

India China Tensions: दलाई लामांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना माओ यांनी चीनची भूमिका मांडली.
Narendra Modi Wishes Dalai Lama
Narendra Modi Wishes Dalai LamaDainik Gomantak
Published on
Updated on

India China Relations: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांना ९० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याने आणि त्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय अधिकारी सहभागी झाल्याने चीनने भारताचा निषेध केला.

तिबेटसंबंधी मुद्द्यांवर चीनची संवेदनशीलता भारताने पूर्णपणे समजून घ्यायला हवी, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग म्हणाल्या. ‘‘तिबेटसंबंधी मुद्द्यांवर चीनची भूमिका सर्वांना माहीत आहे,’’ असे त्या म्हणाल्या.

दलाई लामांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना माओ यांनी चीनची भूमिका मांडली.तिबेटचे १४ वे दलाई लामा हे अनेक वर्षापासून राजकीयदृष्ट्या निर्वासित आहे.

Narendra Modi Wishes Dalai Lama
Xi Jinping: जिनपिंग यांचे 'अध्यक्षपद' जाणार? विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वबदलाची चीनमध्ये रंगली चर्चा

ते फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतलेले असून धर्माच्या आडून झिझांगला चीनपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Narendra Modi Wishes Dalai Lama
China Population Crisis: 'काम करु नका, मुलं जन्माला घाला...' चीनी सरकारचा फर्मान; लोकसंख्या वाढवण्याचा दिला आदेश

चीन तिबेटला ‘शिझांग’ असे संबोधतो.

‘‘शिझांगसंबंधी मुद्दांवर चीनची संवेदनशीलता भारताने जाणून घेणे आवश्‍यक आहे. दलाई लामांची फुटीरतावादीविरोधी भूमिका आणि शिझांगबद्दलच्या मुद्द्यांवर चीनशी असलेल्या बांधिलकीचा भारताने सन्मान करावा,’’ असे त्या म्हणाल्या. भारताने विवेकाने वागावे आणि बोलावे. चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी या मुद्द्याचा वापर करणे थांबवावे, असा इशाराही त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com